आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी काढले होते अपमानास्पद वक्तव्ये
काँग्रेस नेत्यांचा अपमान
अमरावती येथे युवक काँग्रेसच्या वतीने आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. आसामचे मुख्यमंत्री व भाजपचे नेते हिमंता बिस्व शर्मा यांनी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी तसेच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे National Congress President Mallikarjun Kharge यांच्या विरोधात केलेल्या अपशब्दांचा निषेध करत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोस्टर जाळून आणि जोडे मारून आंदोलन केले.

अमरावती शहरातील काँग्रेस भवन येथे जमलेल्या Youth Congress युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. काँग्रेस नेत्यांचा अपमान सहन केला जाणार नाही, असे म्हणत आंदोलनकर्त्यांनी हेमंता बिस्वा शर्मा यांच्या प्रतिमेचे पोस्टर जाळून निषेध नोंदवला. त्याचप्रमाणे दलितविरोधी भाजपा नेत्यांच्या विरोधात तीव्र नारेबाजी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने युवक कार्यकर्ते उपस्थित होते. युवक काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी सांगितले की, देशातील वरिष्ठ नेत्यांविषयी अशा प्रकारची भाषा वापरणे ही अत्यंत निंदनीय बाब आहे. लोकशाहीत मतभेद असू शकतात, मात्र वैयक्तिक टीका आणि अपमानास्पद वक्तव्ये योग्य नाहीत, असे त्यांनी नमूद केले. संबंधित नेत्यांनी तत्काळ माफी मागावी, अन्यथा राज्यभर आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
या आंदोलनात राहुल येवले, वैभव देशमुख, अनिकेत ढेंगळे, समीर जवंजाळ, सागर कलाने, निलेश गुहे, आशिष यादव, राहुल साबळे, अक्षय साबळे, ऋत्विक देशमुख, केदार भेंडे, गोकुल देशमुख, रोहित खोब्रागडे, अमेय येऊतकर, मुकेश लालवानी, आकाश गेडाम, रोहीत खंडेराव, हर्षल साखरकर, युवराज सोलव,शुभम वानखडे, आनंद बरडे, श्रेयस गाडे, श्रेयस धर्माळे, जिगर शिंदे, लकी धनाडे व इतर युवक काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तेव्हा माझ्यासमोरही धर्मांतराशी संबंधित काही संशयास्पद प्रकरणे आली होती – अमृता फडणवीस
कामगारांचे खरे उद्धार करते डॉ. बाबासाहेब आंबेडकर – प्रा. विशाल नंदागवळी






