best news portal development company in india

विदर्भ पटवारी संघ बुलडाणाच्या अध्यक्षपदी सलग ९ व्यांदा विजेंद्र धोंडगे बिनविरोध

SHARE:

जिल्हा उपाध्यक्षपदी राहुल चौधरी, जिल्हा सहसचिवपदी प्रभाकर गवळी तर जिल्हा कोषाध्यक्षपदी संजय डुकरे यांचीही बिनविरोध निवड

बुलढाणा न्यूज https://buldhananews.in/

विदर्भ पटवारी संघ नागपूर जिल्हा शाखा बुलढाणा ची वार्षिक आमसभा शनिवार, दि.१८ एप्रिल २०२६ रोजी चिखली येथील आशीर्वाद मंगल कार्यालय येथे विदर्भ पटवारी संघ जिल्हा शाखा बुलढाणाचे जिल्हाध्यक्ष विजेंद्र धोंडगे यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत उत्साहात पार पडली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ पटवारी संघ नागपूरचे केंद्रीय अध्यक्ष बाळकृष्ण गाढवे, केंद्रीय सरचिटणीस संजय अनव्हाने, केंद्रीय सहसचिव सौरभ वानखेडे, उपजिल्हाधिकारी सौरभ गावंडे, चिखलीचे तहसीलदार विजय सवडे, माजी केंद्रीय अध्यक्ष मनोज दांडगे, माजी केंद्रीय सहसचिव मधुकर जायभाये, समन्वय महासंघ प्रतिनिधी विजय बोराखेडे, नायब तहसीलदार हरी वीर, नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड, केंद्रीय पदाधिकारी प्रेमानंद वानखेडे, मंडळ अधिकारी संघ जिल्हाध्यक्ष अशोक शेळके, माजी जिल्हा सचिव रमाकांत माकोने, तलाठी कर्मचारी पतसंस्थेचे जिल्हाध्यक्ष अनिल जाधव, नागपूर जिल्हा सचिव संदीप अवणे यांसह जिल्ह्यातील सर्व आजी-माजी पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभेच्या सुरुवातीला जिल्हा सचिव शिवानंद वाकदकर यांनी विदर्भ पटवारी संघ नागपूर जिल्हा शाखा बुलढाण्याचा वार्षिक जमा-खर्च आणि अंदाजपत्रक सभागृहासमोर सादर केले, ज्यास उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या कडकडाटात मंजुरी दिली. त्यानंतर वाकदकर यांनी गेल्या वर्षभरात जिल्हा शाखेने केलेल्या विविध कामांचा सविस्तर कार्यवृत्तांत अहवाल सभागृहात वाचून दाखविला. या आमसभेत तलाठ्यांच्या विविध अडीअडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थितांना मार्गदर्शन करताना केंद्रीय सरचिटणीस संजय अनव्हाने यांनी संघटनेच्या वैभवशाली इतिहासाची माहिती देऊन प्रत्येकाने संघशक्ती पाळली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

केंद्रीय अध्यक्ष बाळकृष्ण गाढवे यांनी धोरणात्मक बाबींवर संघटनेच्या वतीने सुरू असलेल्या पाठपुराव्याबाबत माहिती देऊन सभागृहाला मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणामध्ये विजेंद्र धोंडगे यांनी वर्षभरात केलेल्या कामकाजाचा आढावा मांडला व येणार्‍या काळातही संघशक्ती बळकट करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे ग्वाही दिली. सभेच्या उत्तरार्धात विदर्भ पटवारी संघाच्या पुढील वर्षाच्या कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली. यामध्ये जिल्हाध्यक्षपदी विजेंद्र धोंडगे यांची सलग ९ व्यांदा बिनविरोध निवड करून एक नवा विक्रम प्रस्थापित करण्यात आला, तर जिल्हा सचिवपदी शिवानंद वाकदकर यांची सलग तिसर्‍यांदा बिनविरोध निवड करण्यात आली.

‘त्या’ महिलांविरोधात गुन्हा दाखल करा अन् फोटो आणि व्हिडिओ चित्रीकरण शासनाने सार्वजनिक करावे : माजी मंत्री सुबोध सावजी

तेव्हा माझ्यासमोरही धर्मांतराशी संबंधित काही संशयास्पद प्रकरणे आली होती – अमृता फडणवीस

बुवा तेथे बाया या विषयावर गोवर्धन सभागृहात सोमवारी व्याख्यान

Sadhna Thorat
Author: Sadhna Thorat

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *