UAE to introduce new payment system
युएईने दिला इशारा The UAE warned
पश्चिम आशियातील युद्ध अमेरिकेला भरपूर महागात पडताना दिसत आहे. एकीकडे इराणमधील युद्धात अमेरिकेने मोठ्या प्रमाणात डिफेन्स खर्च केल्याचं समोर आलं असताना तेहरान आणि चीनकडून डॉलरचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. या दरम्यान, संयुक्त अरब अमिरातीने अमेरिकेला त्यांच्याकडे डॉलरची कमतरता भासल्यास चीनी युआनमध्ये व्यवहार सुरू केले जातील असा इशारा दिला आहे.
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाची अख्ख्या जगाला झळ बसली आहे आणि याला पश्चिम आशियातील अपवाद ठरलेला नाही. संयुक्त अरब अमिरात, युएई, ला देखील अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्याचे पडसादाला सामोरे जावे लागले आहे. अद्यापही या संघर्षाला विराम लागल्याची चिन्हे दिसत नसून आता युएईचा संयम सुटत चालला आहे.
अमेरिकेचा मित्र म्हणवून घेणार्या युएई ने ट्रम्प यांना युद्धासाठी जबाबदार धरले असून युद्धामुळे अमेरिकन डॉलरची कमतरता निर्माण झाली, तर तेल आणि गॅसचे व्यवहार चिनी युआन किंवा इतर चलनांमध्ये सुरू करतील, असा युएई ने इशारा दिला आहे. मध्य-पूर्वेतील वाढती अस्थिरता आणि इराणसोबत वाढत्या संघर्षासाठी युएईच्या अधिकार्यांनी थेट राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांना जबाबदार धरले आहे. अमेरिकेच्या आक्रमक धोरणांमुळे प्रादेशिक आर्थिक स्थिरतेला धोका निर्माण झाला, असे संयुक्त अरब अमिरातीला वाटतं असे वॉल स्ट्रीट जर्नलने आपल्या लेखात दावा केला आहे.
अशा परिस्थितीत, मध्यपूर्वेतील संघर्षात लवकरच अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धात तोडगा निघाला नाही तर कच्च्या तेलाच्या किमती आणखी भडकण्याची शक्यता आहे. यामुळे जागतिक स्तरावर डॉलरची स्थिती कमकुवत होऊ शकते. डॉलर-व्यतिरिक्त व्यापार स्वीकारल्याने देशांना जुनी कर्जे फेडण्यासाठी आपला मर्यादित डॉलर साठा जपून ठेवता येतो, तर भविष्यातील व्यापार नवीन चलनांमध्ये हस्तांतरित होतो असा मॅक्रोइकॉनॉमिक विश्लेषक ल्यूक ग्रोमेन यांनी युक्तिवाद केला.






