एस.टी.बसस्थानकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३५ वी जयंती उत्साहात साजरी

बुलडाणा : या देशातील कामगारांचे दोनच शत्रू आहे, एक ब्राम्हणशाही आणि दुसरी भांडवलशाही. समानता, जगण्याचे स्वातंत्र्य आणि न्याय नाकारतात ती म्हणजे ब्राम्हणशाही व जे कामगारांचे आर्थिक शोषण करते ती भांडवलशाही या दोन्ही शत्रूपासून कामगारांनी सावध रहावे असे सांगणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मजूरमंत्री असताना देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच कामगारांना त्यांचे न्याय हक्क मिळवून दिले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर कामगारांचे खरे उध्दार करते आहेत असे प्रतिपादन प्रा. विशाल नंदागवळी यांनी केले. राज्य परिवहन महामंडळाच्या कामगार व कर्मचाऱ्यांच्या वतीने बुलढाणा बस स्थानकावर महात्मा ज्योतिराव फुले १९९ वी जयंती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक नंदा गवळी बोलत होते. तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र शासनाचा समाजभूषण पुरस्कारप्राप्त साहित्यिक तथा गुणवंत कामगार सुरेश साबळे, पत्रकार सिद्धार्थ आराख, सुनील तिजारे तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विभाग नियंत्रक शुभांगी शिरसाठ होत्या. व्यासपीठावर विभागीय वाहतूक अधिकारी दिगंबर जाधव, राहुल तांबडे, विनोद इलामे, अजय नाईक, अनिल बहिरम, आगार व्यवस्थापक अमोल गडलिंग, स्थानक प्रमुख रामकृष्ण पवार, वाहतूक निरीक्षक पद्माकर मगर, तुकाराम धारपवार आदी उपस्थित होते. यावेळी महिला हिरकणी कक्षाचे उपस्थित मान्यवरांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले.
साहित्यिक सुरेश साबळे Literary writer Suresh Sable यांनी प्रास्ताविकातून रा.प. महामंडळातील आंबेडकर जयंतीचा इतिहास आणि फुले-आंबेडकरी विचारांची प्रासंगिकता स्पष्ट केली.ते म्हणाले की, जोतीराव फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी एकाचवेळी विविध सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय आघाड्यांवर कार्य केले. जोतीराव फुले यांच्या स्वप्नातील भारतीय समाज व मानवी कल्याणला डॉ.बाबासाहेब आंबेडकर Dr. Babasaheb Ambedkar यांनी कायद्याच्या रूपाने विस्तारित करत मूर्तरूप दिले.भारतीय महिला व कामगारांचे ते उद्धारकर्ते आहे शिवाय भारतीय नागरिकांना विनासंघर्ष मतदानाचा हक्क आणि अधिकार त्यांनी मिळवून दिला आहे. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन काष्ट्राईब राप संघटनेचे विभागीय अध्यक्ष दीपक मिसाळकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन आगार व्यवस्थापक अमोल गडलिंग यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डी. टी. अंभोरे, नरेंद्र खरे, प्रदिप जाधव, जी. पी. मोरे, अनिल वाळके, विजया गवई, ज्योती खरे, व्हि. डी. हिवाळे, आर. डी. हिवाळे, राजू पवार, संजय उबरहंडे, संदीप डुकरे, के व्ही प्रधान पद्माकरअण्णा डोंगरे, आत्माराम चौतमोल सुभाष गवई, प्रमोद पवार, विशाल जाधव, सचिन हिवाळे, जी. जे. सरदार, डी. एस. इंगळे, लक्ष्मी बंड, प्रतिभा वानखेडे, जितु साळवे, भारत आराक, दीपक मिसाळकर, राजेंद्र पवार, सोनू पाटील, सोनू बावसकर, राजू आगाशे, सचिन शेळके यांच्यासह असंख्य एस.टी. कर्मचारी व अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
रोषणाईने बस स्थानक उजळले
उत्सवाचे औचित्य साधून संपूर्ण बस स्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. विद्युत रोषणाईने स्थानक उजळून निघाले होते. यावेळी बसस्थानक परिसरात हिरकणी कक्षाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.एस.टी.मधील सर्व कामगार संघटनांनी, कामगार, कर्मचाऱ्यांनी एकत्र येत हा उत्सव सामूहिकरीत्या साजरा करून एकतेचा संदेश दिला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी प्रदीप इंगळे सर व संचाने सादर केलेल्या ‘भीमस्वर’ गायनाने वातावरणात चैतन्य निर्माण केले. अध्यक्षीय भाषणात विभाग नियंत्रक शुभांगी शिरसाठ यांनी डॉ. आंबेडकरांचे महिला व कामगार विषयक कार्य विस्तृतपणे मांडले. सुरक्षा दक्षता अधिकारी जयंत कांडलकर यांनी महात्मा फुले यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला.
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सोमवार बुलढाणा जिल्हा दौर्यावर
https://buldhananews.in/15956/






