बुलडाणा buldhananews.in
मृत्यूनंतरही समाजासाठी काहीतरी देऊन जाण्याची प्रेरणा देणारा उपक्रम आप्पाजींनी राबवला असून, त्यांच्या प्रयत्नातून एक सकारात्मक सामाजिक संदेश दिला आहे. मृत्यूनंतर अवयव रूपी उरावे व इतरांच्या कामी हा देह पडावा या भावनेतून त्यांनी देहदान व अवयवदानाचा संकल्प केला आहे.त्यांचे झाले असे की, नंदू आप्पा बोरबळे यांच्या आईचे निधन झाले होते. त्यांच्या अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम बुधवार, १५ एप्रिल २०२६ रोजी केळवद येथे होता. याप्रसंगी अस्थिविसर्जन कार्यक्रमाच्या वेळीही त्यांनी केवळ धार्मिक विधींवर भर न देता समाजोपयोगी कार्याला प्राधान्य दिले. या कार्यक्रमात नंदुआप्पा यांनी शाळेला आर्थिक मदत दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा भागविण्यास हातभार लागणार आहे. अशा प्रकारे दुःखाच्या प्रसंगालाही समाजहिताचे रूप देण्याचा आदर्श त्यांनी घालून दिला.
तसेच आप्पाजींनी यासोबतच देहदानाचाही संकल्प देखील केला आहे. या उपक्रमामुळे देहदान, अवयवदान याबाबत जनजागृती होण्यास मदत होत आहे. अनेकांनी त्यांच्या या निर्णयाचे कौतुक केले असून, भविष्यात अशा उपक्रमांना अधिक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. समाजाला दिशा देणारे हे कार्य इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत असून, मृत्यूनंतरही मानवतेची सेवा करता येते, हा संदेश या उपक्रमातून अधोरेखित झाला आहे.
मृत्यू हे जीवनाचे अंतिम सत्य आहे. मृत्यूनंतर शरीराची राख होते.मात्र मृत्यूनंतर अवयव रुपी ऊरावे व इतरांच्या कामी हा देह पडावा या उदात्त हेतूने केळवद ता.चिखली येथील नंदू आप्पा बोरबळे यांनी आईच्या अस्थिविसर्जन कार्यक्रमातच देहदानाचा संकल्प केला. केवळ देहदानाचा संकल्पच केला नाही तर गावातील शाळेला भरघोस अशी आर्थिक मदतही दिली. आईच्या अस्थी विसर्जन कार्यक्रमातील आप्पाजींचे सामाजिकपण सध्या चर्चेचा विषय झाला आहे.
यावेळी संभाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुखराज शिंदे व शिक्षक गजानन धोंडगे यांच्याकडे निधी सुपूर्त करण्यात आला. शरद कला महाविद्यालयाचे प्राचार्य विष्णुपंत पाटील, हृदयरोग तज्ञ डॉ. गजेंद्र निकम, पत्रकार गणेश निकम , पत्रकार राम हिंगे, अमोल बोरबळे, शिवसेना नेते नंदू भाऊ कराळे, माजी सभापती जगन नाना,नारायण वाणी,पवन महाराज, डॉ.आकाश सदावर्ते, निलेश सदावर्ते, सनी पांढरे, मनोहर पवार, नंदिनी बोरबळे आदीं उपस्थिती होते.
दुसर्यासाठी काहीतरी करण्याची वृत्ती नंदू आप्पाला गप्प बसू देत
नंदू आप्पा सर्पमित्र असल्याने अनेक विषारी साप पकडून त्यांना जंगलात सोडून देतात. गोरगरीब असेल, गावातील कुणीही असेल हा सेवाभाव त्यांनी कितीतरी वर्षापासून जोपासला आहे. दुसर्यासाठी काहीतरी करण्याची वृत्ती माणसाला गप्प बसू देत नाही.
नंदू आप्पाकडून संभाजी विद्यालयास अकरा हजार रुपये देणगी
दुःखद प्रसंगातही त्यांनी आपल्या सामाजिकतेचा परिचय देत गावातील संभाजी विद्यालयास अकरा हजार रुपये देणगी दिली. तर आपल्या शरीराचा उपयोग वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी व्हावा या हेतूने देहदानाचा संकल्प सोडला.
सामाजिक बदलासाठी छोटे छोटे प्रयत्न देखील कामी पडतात. त्याची सुरुवात कुठेतरी करावी लागते. एकदा का ते समाजाच्या पचनी पडले की मग स्वीकारले देखील जातात. नंदूआप्पाचे अनुकरण सर्व समाजबांधवांनी घ्यावे असे आवाहन देखील नंदूआप्पा यांनी केले आहे.जिल्हा परिषद शाळेच्या गुरुजींची बौद्धिक झेप थेट पेटंटपर्यंत..
सिलेक्टिव्ह व्हिडिओ लिक करण्यामागे गृहविभागाचा कुटील डाव : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
https://buldhananews.in/15901/







