जिल्हाध्यक्ष व संघटन सृजन अभियाना समन्वयकांची बैठक
मुंबई
भोंदू अशोक खरात प्रकरणाने राज्यातील महायुती सरकार पोखरले आहे. महिलांच्या लैंगिक शोषणाचे ५८ व्हिडिओ असल्याचे सांगितले जात असेल तरी त्यांची संख्या यापेक्षाही मोठी आहे. पण गृहविभागाकडून काही सिलेक्टिव्ह व्हिडिओच लिक केले जात आहेत, त्यामागे मोठे षडयंत्र आहे. खरातच्या सीएकडे मोठ्या प्रमाणात घबाड सापडल्याच्या बातम्या येत आहेत, हा पैसा नेमका कोणाचा? असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली टिळक भवन येथे वरिष्ठ नेते, जिल्हाध्यक्ष व संघटन सृजन अभियानाचे समन्वयक यांची बैठक पार पडली. बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, देशभरात संघटन सृजन अभियान सुरु झाले असून महाराष्ट्रात २७ मार्चपासून हे अभियान सुरु झालेले आहे. १ मे पर्यंत या संदर्भातील शिफारशींचा अहवाल पूर्ण होईल व त्यानंतर जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या जातील. राज्यात ७२ जिल्हाध्यक्ष व ७५० तालुका अध्यक्ष असतील. संघटना गावस्तरापर्यंत पोहचवण्यासाठी ग्रामशाखा सुरु केल्या जाणार आहेत. याबरोबरच युवक काँग्रेस, महिला काँग्रेस. एससी, एसटी, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्षांचीही नियुक्त्या केल्या जाणार आहेत.
महिला व बालविकास मंत्री यांना ही कॉग्रेस प्रदेशाध्यक्षांचे चार प्रश्न
- महाराष्ट राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यावर निशाणा साधत चार प्रश्न उपस्थित केले आहेत.
- महिला व बालविकास मंत्री बेपत्ता आहेत. या सर्व घटनांवर काही एक प्रतिक्रिया आपण त्यांची ऐकलीय का ?
किंवा - या प्रकरणानंतर याबाबत त्यांच्या खात्याअंतर्गत यावर एखादी बैठक घेतली काय ?
- याबाबत राज्यातील पोलिस महासंचालकांना त्या भेटल्यात का?
- राज्यातील पिडीत महिलांना न्याय मिळेल, असा विश्वास देणारे ट्विट किंवा पोस्ट तरी त्यांनी केलीय का ? असे सवाल उपस्थित केले आहेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या या प्रश्नांना आदिती तटकरे उत्तर देणार का?
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ना.आदिती तटकरे राज्य सरकारमधील महिलांचा आवाज किंवा महिलांची जबाबदारी असलेल्या खात्याच्या त्या मंत्री आहेत. मागील काही दिवसांमध्ये खरात प्रकरण असो, यात यांच्या खात्याअंतर्गत येणार्या महिला आयोगाच्या अध्यक्षांवर झालेले आरोप असो, हृषीकेश वैद्य, काल समोर आलेले नवी मुंबईतील आदर्श म्हात्रे प्रकरण असो. रोज राज्यातील महिला भगिणींसोबत अत्याचार झाल्याच्या बातम्या, प्रकरणं समोर येत आहेत.







