best news portal development company in india

प्रदेश काँग्रेसच्या महासचिव पदी विश्वदिप पडोळ : Vishwadeep Padol appointed as General Secretary of Pradesh Congress

SHARE:

भारत जोडो यात्रे दरम्यान बुलढाणा तालुक्यात व्यापक जनसंपर्कामुळे निवड

बुलढाणा(Buldhana) तालुक्यातील डोमरुळ येथील विश्वदिप प्रतापराव पडोळ ( Vishwadeep Padol) यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या महासचिव पदावर निवड झाली आहे. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या स्वाक्षरीने त्यांचे नियुक्तीपत्र नुकतेच जारी करण्यात आल्यामुळे त्यांच्या निवडीमुळे काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारत जोडो यात्रे दरम्यान विश्वदिप पडोळ यांनी बुलढाणा तालुक्यात व्यापक जनसंपर्क साधत त्यांनी यात्रेचा प्रभाव वाढवण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे निवड झाल्याचे सांगण्यात येत आहे.

विश्वदिप पडोळ यांची ही नियुक्ती त्यांच्या सातत्यपूर्ण संघटनात्मक कामगिरीची पावती मानली जात आहे. युवक काँग्रेसमध्ये त्यांनी काम करत नेतृत्वगुण सिद्ध केले आहेत. २०२२ मध्ये बुलढाणा जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून त्यांनी संघटन बळकट करण्यासाठी विविध उपक्रम राबवले. त्यानंतर २०२४ मध्ये प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव म्हणून जबाबदारी स्वीकारत त्यांनी राज्य पातळीवरही आपला ठसा उमटवला. त्यानंतर प्रदेश प्रवक्ते म्हणूनही त्यांनी पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडत विरोधकांवर आक्रमक भूमिका घेतली.

पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या मोहिमांमध्ये विश्वदिप पडोळ यांनी सक्रिय भूमिका बजावली आहे. भारत जोडो यात्रे दरम्यान बुलढाणा तालुक्यात व्यापक जनसंपर्क साधत त्यांनी यात्रेचा प्रभाव वाढवण्यासाठी प्रयत्न केले. चलो पंचायत आणि चलो वॉर्ड सारख्या अभियानांची चिखली विधानसभा मतदारसंघात प्रभावी अंमलबजावणी करून त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागात युवक काँग्रेसचे जाळे अधिक मजबूत केले. तसेच जिल्ह्यात आयोजित संविधान जागर यात्रेत त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत संविधान मूल्यांबाबत जनजागृती केली.

पडोळ यांनी केवळ राज्यापुरतेच मर्यादित न राहता राष्ट्रीय राजकारणातही सहभाग नोंदवला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुक ीदरम्यान कस्तुरबा नगर मतदारसंघात त्यांनी प्रचाराचे नियोजन, बूथ व्यवस्थापन आणि कार्यकर्त्यांचे समन्वय साधण्याची जबाबदारी पार पाडली. त्यांच्या या कामगिरीमुळे पक्षाच्या निवडणूक व्यवस्थापनात त्यांची क्षमता अधोरेखित झाली. या नियुक्तीबद्दल प्रतिक्रिया देताना पडोळ यांनी सांगितले की, ही जबाबदारी अधिक जोमाने पार पाडत युवक काँग्रेस संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असून पक्षाने दिलेला विश्वास सार्थ ठरवणार आहेत. तसेच या प्रवासात जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभल्याचे त्यांनी नमूद केले.

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन

अबब… शेतकर्‍यांच्या मोटारपंपाची ६ लाख ६ हजार रुपयांची केबल चोरीला

Sadhna Thorat
Author: Sadhna Thorat

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *