चिखली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
सिसीटिव्ही फुटेज मधील व्यक्तींची ओळख पटली
साळवे कुटुंब मानसिक तणावात
साळवे कुटुंब मानसिक तणावाखाली आले असून, प्रविण साळवे यांनी त्यांचे मामा दादाराव श्रीराम पडघान यांच्यासह चिखली पोलीस ठाण्यात धाव घेत अधिकृत तक्रार दिली. पोलिसांनी स्टेशन डायरी क्रमांक २२/२६ अन्वये नोंद घेत भारतीय न्याय संहिता तसेच जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
बुलढाणा न्यूज
चिखली तालुक्यातील खंडाळा मकरध्वज Khandala Capricorn flag येथे १६ मे रोजी शनि अमावस्येच्या रात्री एका धक्कादायक प्रकारामुळे गावात चांगलीच खळबळ उडाली होती. यामध्ये अघोरी कृत्य व जादूटोण्याच्या संशयातून एका कुटुंबाच्या घरासमोर मंत्ररलेले लिंबू टाकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून, ही संपूर्ण घटना घराबाहेरील सिसीटिव्ही कॅमेर्यात कैद झाली आहे. याप्रकरणी चिखली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रविण साळवे (वय ५० वर्ष) हे नेहमीप्रमाणे सकाळी फिरण्यासाठी घराबाहेर गेले असता त्यांची पत्नी साक्षी साळवे यांनी सकाळी फोन करून घराच्या मुख्य दरवाजाजवळ एक पूर्ण व एक कापलेले लिंबू पडले असल्याची माहिती दिली. यानंतर प्रविण साळवे तातडीने घरी परतले. त्यांनी पाहणी केली असता, हा प्रकार अंधश्रद्धा, जादूटोणा किंवा अघोरी कृत्याच्या हेतूने करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
घटनेनंतर साळवे यांनी घराबाहेरील सिसीटिव्ही फुटेज तपासले असता, गावातीलच एक संशयित इसम चोर पावलाने घराजवळ येऊन काही क्षणांत लिंबू फेकून निघून जात असल्याचे स्पष्ट दिसून आले. संबंधित व्यक्ती शेख गणी शेख दादु असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच त्यांचा मुलगा शेख अजमत शेख गणी याचाही या प्रकरणात उल्लेख करण्यात आला आहे. प्रकरणाची माहिती मिळताच गावातील तंटामुक्ती अध्यक्ष नानाभाऊ ठेंग यांना बोलावण्यात आले. त्यांनी सिसीटिव्ही फुटेज पाहिल्यानंतर फुटेजमधील व्यक्तींची ओळख पटल्याचे सांगण्यात आले. शनि अमावस्येच्या पार्श्वभूमीवर पूर्ववैमनस्यातून किंवा अघोरी प्रकाराच्या हेतूने हा प्रकार घडवून आणल्याची चर्चा गावात रंगली आहे.
दिव्यांगाचे मसीहाकडे शिवसेनेच्या विदर्भ विभागीय नेतेपदी बच्चू कडू
बुलढाणा जिल्ह्यातील पहिल्या महिला मानद वन्यजीव रक्षक म्हणून डॉ.वैशाली निकम ह्यांची निवड व सन्मान








