best news portal development company in india

बुलढाणा जिल्ह्यातील पहिल्या महिला मानद वन्यजीव रक्षक म्हणून डॉ.वैशाली निकम ह्यांची निवड व सन्मान

SHARE:

buldhananews

बुलढाणा –   महाराष्ट्रातील मानद वन्यजीव रक्षक पदाच्या नियुक्ती नुकत्याच जाहीर झाल्या असून वन्यजीव संवर्धनासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ही यंत्रणा आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील मानद वन्यजीव रक्षक पदासाठी या वर्षापासून प्रत्येक जिल्ह्यातील महिलांना देखील स्थान देण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्यासाठी डॉ. वैशाली निकम यांची नियुक्ती महाराष्ट्र शासनाचे विशेष कार्य अधिकारी उदय ढगे यांच्या स्वाक्षरीने दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी शासन निर्णयानुसार करण्यात आली आहे. ही नियुक्ती पुढील तीन वर्षासाठी असणार आहे. वन्यजीवांच्या प्रश्नावर ठाम भूमिका घेणारे व शासनाच्या मार्फत राबवण्यात येणार्‍या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन जनहिताचे निर्णय या समितीमार्फत घेणे व जनतेची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी या पदाची नियुक्ती करण्यात येत असते.

मृण्मयी मल्टीपर्पज सोसायटीच्या माध्यमातून बालकांमध्ये वन्य जीवाबाबत आवड निर्माण व्हावी तसेच पर्यावरण पूरक व आरोग्य वर्धक उपक्रमासोबतच वनविभागाच्या सहकार्याने विद्यार्थी व बालकांसाठी डॉ. वैशाली निकम पुढाकार घेऊन विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. पक्षी गणना, चिमणी गणना ,पक्षी निरीक्षण, पर्यावरण पूरक घरट्यांची निर्मिती करून त्याचे वितरण, वन्यजीव सप्ताह निमित्त विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना वने व जंगली प्राण्यांविषयी माहिती देऊन त्याविषयी जनजागृती करणे. वन्यजीवांसंबंधी निबंध स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा, तसेच प्रदर्शनाचे आयोजन करून बुलढाणा शहरातील तसेच जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये जनजागृती करणे. अशा विविध कार्यक्रमांची व कार्याची दखल वनविभागाने घेऊन डॉ. वैशाली निकम यांची मानद वन्यजीव रक्षक पदी निवड केली आहे. या निमित्याने बुलढाण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील वाकोडे व वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर पडोळ यांनी वैशाली निकम यांचे अभिनंदन केले आहे.

डॉ. वैशाली निकम यांच्या या नियुक्ती बद्दल या समितीत अनेक वर्ष कार्य करणारे माजी मानद वन्यजीव रक्षक मनजीतसिंग शिख यांनी  डॉ.वैशाली निकम यांचे अभिनंदन केले असून या समितीमध्ये नवीन काम करणार्‍या चेहर्‍यांना संधी मिळते व त्यांचे कडून चांगले काम व्हावे अशा अपेक्षा व्यक्त करत शुभेच्छा दिल्या आहेत. निसर्ग कट्टा  अकोलाचे अमोल सावंत यांनी देखील डॉ.वैशाली निकम यांचे अभिनंदन केले आहे. लोणार येथील सचिन कापुरे यांच्या कार्याची दखल घेत बुलढाणा जिल्हा मानद वनरक्षक पदी निवड झाली आहे. डॉ. वैशाली निकम यांच्या या निवडीबद्दल बुलढाण्यातील सामाजिक क्षेत्रात व पर्यावरण क्षेत्रात काम करणार्‍या विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Buldhana News : मुंबई मोर्चाच्या नियोजनाची बुलडाणा येथे सीटूची बैठक उत्साहात

Buldhana News
Author: Buldhana News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

best news portal development company in india
और देखें