best news portal development company in india

बुलढाण्यात महाकवी वामनदादा कर्डक यांना २२ व्यां स्मृतिदिनी करण्यात आले अभिवादन

SHARE:

बुलढाणा न्यूज
महाकवी वामनदादा कर्डक The great poet Vamandada Kardak हे भारतातील पुरोगामी प्रागतिक आंबेडकरी चळवळीतील सजग पहारेदाराच्या रूपात त्यांनी कायम आंबेडकरी सांस्कृतिक आघाडीद्वारे गायन प्रबोधनाद्वारे समाजसेवा दिली असे विचार प्रा.आर.आर.वानखेडे यांनी स्थानिक वामनदादा कर्डक स्मारक परिसरातील पुतळ्यासमोर येथील Folk Poet Vamandada Kardak Foundation लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानद्वारा आयोजित २२ व्यां स्मृतिदिनी अभिवादन सभेत बोलतांना मांडले.

यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शाहीर डी.आर.इंगळे, सचिव सुरेश साबळे, पत्रकार सिद्धार्थ आराख, अरूण जैन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती अध्यक्ष पवन भालेराव, विजय काळे, पत्रकार संदीप वानखेडे,अमोल खरे, पी.आर.इंगळे, चंद्रशेखर केणे, अशोक दाभाडे, पंजाबराव गायकवाड, मोहन सरकटे, धम्मा गवई, अनंता मिसाळ, शाहीर अवकाळे, विलास इंगळे, रविकिरण टाकळकर, केशरताई इंगळे, आशाताई वाकोडे, अनिता कापरे, भैया पाटील, सुखदेव जाधव यांच्यासह बहूसंख्य कलावंत,शाहीर,नागरिक महिला उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रारंभी स्मारक परिसरातील वामनदादा कर्डक यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार व पुष्प अर्पण करून अभिवादन केल्यानंतर प्रतिष्ठानचे सचिव तथा साहित्यिक सुरेश साबळे यांनी प्रास्ताविकात वामनदादा कर्डक, आंबेडकरी सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय चळवळ, त्यात वामनदादा कर्डक यांचे योगदान आणि आजच्या काळात चळवळी समोरील आव्हानं याबाबत चर्चा आणि कार्यक्रमाची प्रतिष्ठानची भुमिका विशद केली. शाहिर डी आर इंगळे, प्रा आर आर वानखेडे, चंद्रशेखर केणे, विजय काळे, अशोक दाभाडे, अमोल खरे, पी आर इंगळे, मोहन सरकटे, अनंता मिसाळ इत्यादीनी अभिवादनपर मतं व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन तथा प्रास्ताविक संस्थेचे सचिव तथा साहित्यिक सुरेश साबळे यांनी केले तर आभार संस्थाध्यक्ष शाहिर डी.आर.इंगळे यांनी मानले.

एटीएम मशीन फोडून अंदाजे सात लाखांची रोकड लंपास

Buldhana News
Author: Buldhana News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

best news portal development company in india
और देखें