best news portal development company in india

एटीएम मशीन फोडून अंदाजे सात लाखांची रोकड लंपास

SHARE:

बोराखेडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरीच्या घटनांचा आलेख उंचावला

Motala Tehsil Office मोताळा तहसील कार्यालय चौकातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून जवळपास ७ लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना आज सकाळी नागरिकांच्या निदर्शनास आली. प्रत्यक्षदर्शीनी याबाबतची माहिती बोराखेडी पोलिसांना दिली. बोराखेडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे फिरवली आहे.

एटीएम फोडण्याच्या घटनेची माहिती मिळताच बुलढाणा पोलीस अधीक्षक निलशे तांबे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. विशेष म्हणजे हे एटीएम Borkhedi Police बोरखेडी पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असल्याने पोलिसांच्या गस्त व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी एटीएम मशीन फोडून त्यातील अंदाजे ७ लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे. गेल्या आठवडाभरापासून बोराखेडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरीच्या घटना वाढल्या आहेत. एका महिलेचेे लाखो रूपयांचे सोने सुद्धा चोरीला गेले होते. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे. बोराखेडी पोलीस सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून आरोपीचा शोध घेत आहते . घटनास्थळी फॉरेन्सिक व एलसीबीचे पोलिस निरीक्षक सुनील अंबुलकर हे सुद्धा दाखल झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बोराखेडी पोलीस करीत आहे.

तीस वर्षीय महिलेचा घरात घुसून विनयभंग

Buldhana News
Author: Buldhana News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

best news portal development company in india
और देखें