प्रा.श्याम मानव करणार भांडाफोड; डॉ.अशोक खरातांच्या अध्यक्षतेत जाहिर व्याख्यान
बुलढाणा : समाजात वाढत असलेली अंधश्रध्दा व बुवाबाजी ही मोठी चितेंची बाब होऊन बसली आहे. आज विज्ञान युगाच्या काळातही, शिक्षणाचा येवढा प्रसार होऊन देखील अनेक भोळी भाबडी लोक बुवा बाजीला बळी पडतांना दिसत आहे. चिकित्सक अन विवेकवादी व विज्ञानवादी विचारांचा विसर पडला की काय असा प्रश्न पडला आहे. अशा वेळी जन प्रबोधनासाठी बुलढाणा अर्बन मुख्यशाखसमोरील गोवर्धन सभागृह येथे येथे दि २० एप्रिलला रोजी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक व राष्ट्रीय संघटक प्रा श्याम मानव यांचे बुवा तेथे बाया या विषयावर सखोल व प्रबोधनात्मक व्याख्यान सायं ६.३० वाजता पार पडणार आहे.
भोंदू खरात सारख्या लोभी बाबांच्या जाळ्यात स्त्रीया का फसतात ? मोठ्या प्रमाणात हा लोंढा का वाढत आहे ? सुशिक्षित असूनही असे प्रकार का घडतात ? यापासून आपले कुटूंब कसे सुखरूप ठेवावे ? या सर्व विषयांचा उलगडा अनेक भोंदू बाबांचा भांडाफोड करून विज्ञानवाद रुजविणारे प्रा श्याम मानव करणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.अशोक खरात Dr. Ashok Kharat हे असणार आहेत. प्रमुख उपस्थितीत Rajshri Shahu Familyराजश्री शाहू परिवाराचे तथा बुलढाण्यातील युवा उद्योजक संदीप शेळके Sandeep Shelke तथा डॉ.इंदुमती लहाने हे असणार आहेत.
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती बुलढाणा All India Superstition Eradication Committee Buldhana तथा बुलढाणा जिल्ह्यातील सर्व समविचारी संघटनाच्या माध्यमातून या लोकप्रबोधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, तरी समितीच्या वतीने बुलढाणा शहरातील सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे .
तेव्हा माझ्यासमोरही धर्मांतराशी संबंधित काही संशयास्पद प्रकरणे आली होती – अमृता फडणवीस
सिलेक्टिव्ह व्हिडिओ लिक करण्यामागे गृहविभागाचा कुटील डाव : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ






