best news portal development company in india

यंदा जांभळाचा तुटवडा

SHARE:

आयुर्वेदातही जांभळाला महत्व

बुलढाणा न्यूज buldhananews उन्हाळा सुरू झाला की जांभळाचा हंगाम रंगात येतो. गावोगावच्या बाजारपेठा, रस्ते आणि शेतशिवारात मोठ्या प्रमाणात जांभूळ विक्रीसाठी उपलब्ध होत असे. मात्र, यंदा जांभूळ या फळाचे उत्पादन कमालीचे घटले असून, बाजारपेठेत या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या फळाचा मोठा तुटवडा जाणवत आहे. आवक कमी असल्याने जांभळाचे दरही चांगलेच कडाडले आहेत.

शेतकर्‍यांच्या मते, यंदा सतत बदलणारे हवामान, अवकाळी पाऊस, उन्हाची तीव्र लाट आणि पाण्याची टंचाई यामुळे जांभूळ फळाच्या धारणेवर विपरीत परिणाम झाला आहे. तसेच, वाढत्या शहरीकरणामुळे ग्रामीण भागातील ओढे, शेतकाठ आणि जंगलातील जुन्या जांभळाच्या झाडांची झालेली तोडही या उत्पादनातील घसरणीला कारणीभूत ठरली आहे. दर वाढलेले असूनही नागरिक आरोग्याच्या दृष्टीने आवर्जून जांभूळ खरेदी करताना दिसत आहेत. जांभूळ हे केवळ चवीला आंबट-गोड नसून ते उत्तम औषधी फळ मानले जाते. उन्हाळ्यात उष्णतेमुळे जाणवणारा थकवा आणि शरीरातील पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी जांभूळ शरीराला नैसर्गिक थंडावा देण्याचे काम करते. आयुर्वेदातही या फळाला व त्याच्या बियांच्या चूर्णाला विशेष महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर, भविष्यात हा हंगाम टिकवण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी जांभळाच्या झाडांचे जतन Preservation of purple trees व मोठ्या प्रमाणावर लागवड करण्याचे आवाहन केले आहे.

दिव्यांगाचे मसीहाकडे शिवसेनेच्या विदर्भ विभागीय नेतेपदी बच्चू कडू

बुलढाणा जिल्ह्यातील पहिल्या महिला मानद वन्यजीव रक्षक म्हणून डॉ.वैशाली निकम ह्यांची निवड व सन्मान

Buldhana News
Author: Buldhana News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

best news portal development company in india
और देखें