Bhagwat Iratkar was awarded the Late Govt. Takalkar Guruji Memorial Music Service Award.
बुलढाणा
चिखली येथील प्रथितयश शिक्षक विवेकानंद शिकवणी वर्गाचे संचालक भागवत इरतकर यांना 2026 चा स्वातंत्र्य सैनिक स्व. रमेशराव भाऊराव पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणारा स्व. रा.गो. टाकळकर गुरुजी स्मृती संगीत सेवा पुरस्कार Late Gov. Takalkar Guruji Memorial Music Service Awardजाहीर झाला आहे.
भागवत इरतकर यांनी शैक्षणिक क्षेत्रातील कार्यास सोबतच चिखली शहरातील सांगितिक वातावरण समृद्ध करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेत स्वरसाधना संगीत विद्यालयाच्या वतीने देण्यात येणार्या संगीत सेवा पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आल्याचे अरविंद टाकळकर व मिना गणेशराव पाटील यांनी एका पत्रकाव्दारे कळविले आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख रुपये 5000 व स्मृतिचिन्ह शाल असे असते. गेल्या 21 वर्षापासून चिखली शहरात मराठी नववर्षाचे स्वागत करतांना गुढीपाडव्याच्या दिवशी पाडवा पहाट कार्यक्रमाचे आयोजन भागवत इरतकर यांच्या पुढाकाराने केले जाते. मराठी संस्कृती व परंपरा जतन करत असतांनाच संगीत क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या व नवोदित कलाकारांनाही पाडवा पहाटच्या माध्यमातून त्यांनी आपली कला सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली.
चिखली शहरात शास्त्रीय संगीता सोबतच सुगम संगीत,, नाट्य संगीत भक्ती गीत, भावगीत या कलाक्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या अनेक कलाकारांना बोलवून चिखलीकरांना दरवर्षी सांगितिक मेजवानी उपलब्ध करून दिली. चिखली शहरासोबतच जिल्ह्यातील संगीत रसिकांना घडवण्याचे कार्य भागवत इरतकर Bhagwat Iratkar यांनी केले आहे. या कार्याची दखल घेत त्यांना यावर्षीचा स्व. रा.गो. टाकळकर गुरुजी संगीत सेवा पुरस्कार दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी स्व. रा.गो. टाकळकर गुरुजी स्मृति संगीत समारोहात बुलडाणा्च्या गोवर्धन सभागृहात सांयकाळी ७ वाजता मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी बुलढाणा शहर व परिसरातील संगीत रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन स्वर साधना संगीत विद्यालयाच्या,वतीने करण्यात आले आहे.
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सोमवार बुलढाणा जिल्हा दौर्यावर






