best news portal development company in india

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नव्या चेहर्‍यांना संधी मिळण्याची शक्यता

SHARE:

काही जुन्या नावांना डच्चू मिळण्याची शक्यता

पक्षाची सर्व सूत्रे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार Deputy Chief Minister Sunetra Pawar आणि खासदार पार्थ पवार MP Parth Pawar यांच्या हाती एकवटली असताना, खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. यामुळे पक्षात लवकरच मोठे बदल होणार असल्याची चर्चा रंगली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या काही दिवसांपासून घडामोडींना वेग आला आहे. आता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षाच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत अनेक नव्या चेहर्‍यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, माजी मंत्री धनंजय मुंडे, मंत्री हसन मुश्रीफ आणि अनिल पाटील यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत महत्वाची जबाबदारी मिळू शकते. या संदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत देवगिरी बंगल्यावर एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला खासदार पार्थ पवार देखील उपस्थित होते.नव्या कार्यकारिणीचा फेरबदल करताना काही जुन्या नावांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. बैठकीत राष्ट्रीय कार्यकारिणीतून एक महिला लोकप्रतिनिधी आणि सुबोध मोहिते यांचे नाव वगळण्याबाबत प्राथमिक चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

गेल्या पंधरा दिवसांत प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांचा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत उल्लेख नव्हता. यामुळे दोन्ही बडे नेते नाराज असल्याची चर्चा होती. त्यानंतर दोघांनी शरद पवार यांची भेट घेतली. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रीय कार्यकारिणीचा फेरबदल होणार असल्याची माहिती समोर आली आहे.सध्या पक्षात कोणती नावे समाविष्ट होणार, कोणती नावे वगळली जाणार आणि राष्ट्रीय कार्यकारिणीची अंतिम यादी कधी जाहीर होणार, याकडे पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

पेट्रोल, डिझेल टंचाईच्या निषेधार्थ…. शिवसेना उबाठाकडून मेलोडी चॉकलेटचे वाटप

Buldhana News
Author: Buldhana News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

best news portal development company in india
और देखें