best news portal development company in india

पेट्रोल, डिझेल टंचाईच्या निषेधार्थ…. शिवसेना उबाठाकडून मेलोडी चॉकलेटचे वाटप

SHARE:

शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांच्या नेतृत्वात वाटप
मलकापूर शहरात सहा पेट्रोल पंप यातील पाच पेट्रोल पंप बंद

बुलढाणा न्यूज

मलकापूर- देशातील शेतकरी, तरुण, महिला, मजूर आणि लहान शेतकरी दु:खात आहेत. दोन महिन्यांपासून देशात बेरोजगारी वाढतेय हे मी सांगतोय, पण माझी खिल्ली उडवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हसत आहेत, रिल्स बनवत आहेत आणि भाजपचे लोक टाळ्या वाजवत आहेत. तर मलकापूरात ४०-४२ डिग्रीच्या भर उन्हाळ्यात नागरिकांना, शेतकर्‍यांना, ट्रॅक्टर धारकांना पेट्रोल आणि डिझेलसाठी उन्हातान्हात लाईनमध्ये उभे राहावे लागत आहे, तर दुसरीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेशात फिरून मेलोडी चॉकलेट वाटप करीत आहे. मोदी सरकारचा निषेध म्हणून शिवसेना
उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांच्या नेतृत्वात पेट्रोलपंप मेलोडी चॉकलेट वाटप करण्यात आले.

मलकापूर शहरात एकूण सहा पेट्रोल पंप असून यातील पाच पेट्रोल पंप आज बंद असल्याने नांदुरा रोडवरील नायरा पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी पेट्रोल व डिझेल साठी एकच गर्दी केली होती.लोकांना पेट्रोल, डिझेल, गॅससाठी उन्हातान्हात उभं करून विदेशात फिरणार्‍या मोदी सरकारचा जाहीर निषेध करीत शिवसेना (उबाठा)च्या पदाधिकार्‍यांनी नायरा पेट्रोल पंपावर जाऊन उपस्थित वाहनधारकांना मेलोडी चॉकलेट वाटप करून मोदी सरकारचा जाहीर निषेध केला.

नायरा पेट्रोल पंपावर यांनी वाटले मेलोडी चॉकलेटचे वाटप

शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, शिवसेना शहर प्रमुख हरीदास गणबास, शिवसेना उपशहर प्रमुख बाळू पोलाखरे, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत, नगरसेवक रफिकभाई बर्तन वाले, नितीन गोसावी,वाहतूक सेना शहर प्रमुख इम्रान लकी, शाखाप्रमुख हसन गौरी,माजी उपनगराध्यक्ष महादेव वनारे, अनंता तायडे, संतोष राजपूत,शरद खराटे यांच्या सह शिवसैनिक उपस्थिती होती.

कर्जमाफी ३० जूनपूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन

आमदार श्वेता महाले यांना मनोज लाहूडकरचे आवाहन

https://buldhananews.in/archives/15868

Buldhana News
Author: Buldhana News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

best news portal development company in india
और देखें