best news portal development company in india

शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध करून द्या, अन्यथा रोष ओढावेल!

SHARE:

शेती मशागतीच्या पार्श्व भूमीवर रविकांत तुपकर याचा इशारा

बुलढाणा न्यूज
महाराष्ट्र राज्यात निर्माण झालेल्या डिझेल टंचाईमुळे शेतकर्‍यांची शेतीकामे ठप्प होत असून सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा संतप्त शेतकर्‍यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

सद्यःस्थितीत खरीप हंगामाच्या पार्श्व भूमीवर नांगरणी, पेरणी, फवारणी यांसारखी महत्त्वाची शेतीकामे सुरू आहेत. मात्र अनेक पेट्रोल पंपांवर डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्या ने शेतकरी आणि ट्रॅक्टरचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी तासअन् तास रांगा लागत असून कॅनमध्ये डिझेल देण्यास नकार दिला जात असल्याने शेतकर्‍यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. यासंदर्भात रविकांत तुपकर यांनी प्रशासन आणि पेट्रोलियम विभागाने तातडीने हस्तक्षेप करण्या ची मागणी केली आहे. शेती मशागतीसाठी शेतकर्‍यां ना कॅनमध्ये डिझेल उपलब्ध करून देण्याचे आदेश द्यावेत, तसेच ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांवर पुरेसा डिझेल साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. डिझेल टंचाईमुळे शेतीचे नियोजन कोलमडत असून शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. शासनाने त्वरित उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

आमदार श्वेता महाले यांना मनोज लाहूडकरचे आवाहन

कर्जमाफी ३० जूनपूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन

Buldhana News
Author: Buldhana News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

best news portal development company in india
और देखें