best news portal development company in india

सेवानिवृत्त शिक्षकाची दगडाने ठेचून हत्या केल्याने ठाणेगावात खळबळ

SHARE:

Sensation in Thanegaon after retired teacher is bludgeoned to death with a stone.

शांत भाग म्हणून ठाणेगाव ची ओळख

भंडारा – पवनी तालुकयातील ठाणेगाव येथील तलाव परिसरात एका सेवानिवृत्त शिक्षकाचा दगडाने ठेचून निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी, २५ जून २०२६ दुपारी सुमारे बारा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पवनी तालुयात मोठी खळबळ उडाली आहे. मृत शिक्षकाचे नाव लीलाधर मोहरकर (६२, कोंढा) असे आहे. शांत व ग्रामीण भाग म्हणून ओळख असलेल्या ठाणेगाव परिसरात घडलेल्या या खुनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर मोठ्या दगडाने वार करून त्यांची हत्या केली. हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू करण्यात आला आहे. घटनास्थळावरील पुरावे संकलित करण्यात येत असून संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. शांत व ग्रामीण भाग म्हणून ओळख असलेल्या ठाणेगाव परिसरात घडलेल्या या खुनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

 

काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे नवनियुक्त चेअरमन अनिरुद्ध वनकर यांचा पदग्रहण सोहळा संपन्न

आईचे आजारपणामुळे निधन अन् ती  चार महिन्यांची गर्भवती..

Buldhana News
Author: Buldhana News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

best news portal development company in india
और देखें