best news portal development company in india

आईचे आजारपणामुळे निधन अन् ती  चार महिन्यांची गर्भवती..

SHARE:

अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अमरावती (अंजनगाव सुर्जी)- ३४ वर्षीय महिला मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असून ती आपल्या आईसोबत राहत होती. काही वर्षांपूर्वी तिच्या पतीचे निधन झाले. तिच्या आईचेही नुकतेच आजारपणामुळे निधन झाले. त्यानंतर नातेवाईकांनी तिला गावी आणले असता ती गर्भवती असल्याचे निदर्शनास आले. ही घटना अंजनगाव सुर्जी येथील आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, वेडसर महिला लैंगिक अत्याचारामुळे गर्भवती झाल्याची धक्कादायक घटना अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी विकीन अरूण निमकार (वय ३६) याच्याविरूध्द संशयित म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सरकारी रुग्णालयात तपासणी केल्यानंतर महिला अंदाजे चार महिन्यांची गर्भवती असल्याचे डॉकटरांनी सांगितले. यानंतर नातेवाईकांनी चौकशी केली असता गावातील विकीन अरूण निमकार याने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. पीडितेच्या जबाबावरून संबंधित आरोपीविरुद्ध अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Buldhana News
Author: Buldhana News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

best news portal development company in india
और देखें