best news portal development company in india

बिडी न दिल्यामुळे वृद्धाची हत्या…

SHARE:

Elderly man murdered for refusing to give a bidi…

 

अमरावती- बिडी न दिल्यामुळे वृद्धाची चाकू व दगडाने ठेचून हत्या केल्या प्रकरणात राजापेठ पोलिसांनी मध्यरात्रीच तिन्ही आरोपींना अटक केली. गुरुवारी त्यांना न्यायालयाने २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. उद्देश उर्फ चिकू संजय खरड (वय २५), सुमित उर्फ सनी रवी सहारे (वय १९) आणि प्रणय तुकाराम कडू (वय २५ तिन्ही रा. मायानगर) अशी अटकेतील आरोपींची तर माणिकराव बळीरामजी बोरकर (वय ६५, रा. गोदावरी कॉलनी, जुना बायपासलगत) असे मृताचे नाव आहे. सुमित उर्फ सनी याच्यावर याआधी शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल आहे.

तिन्ही आरोपी एमआयडीसीमधील वेगवेगळ्या कंपनीत काम करतात. आणि १५ ते २० दिवसांआड ते तिघे सोबत मद्यपान करतात. मंगळवारी (दि.२३) रात्री तिघेही एकत्र भेटले. त्यानंतर त्यांनी नवाथे चौकातील वाईन शॉपमधून ७६० रुपयांची दारु खरेदी केली आणि तिघे सुतगिरणी येथील टिनाच्या शेडमध्ये मद्यपानाकरिता गेले. आधीच तिथे बोरकर हे दारु पित होते. त्यांच्या बाजूला तिघेही दारु पित बसले होते. यावेळी सनी सहारे याने जवळील खंजिर काढून दोघांना दाखविला. त्यावेळी प्रणयने व्हिडीओ काढला. काही वेळाने तिघांनी बोरकरला बिडी मागितली, परंतु त्यांनी नकार दिला. त्यामुळे तिघांनी बोरकरला जबर मारहाण करून खंजिरने वार केले आणि तेथून निघून गेले अशी कबूली मारेकर्‍यांनी दिली.

पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्याम घुगे यांच्या मार्गदर्शनात राजापेठ ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे, सचिन पवार, पोलीस उपनिरीक्षक राणप्रताप यादव, पोलीस अंमलदार मनिष करपे, पवन तिवारी, पंकज खटे, रवि लिखीतकर, अर्जुन कदम, पवन तिवारी, प्रशांत बोलोकार, आकाश यादव, अंकुश काळे, अमोल खंडेझोड, अमोल देशमुख आणि पंकज घाटे आदींनी ही कारवाई केली.

 

सेवानिवृत्त शिक्षकाची दगडाने ठेचून हत्या केल्याने ठाणेगावात खळबळ

 

Buldhana News
Author: Buldhana News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

best news portal development company in india
और देखें