best news portal development company in india

माजी मंत्र्यांची राष्ट्रपतींकडे मागणी

SHARE:

माजी मंत्र्यांची राष्ट्रपतींकडे मागणी
तुकाराम मुंडे यांना राष्ट्रपती सन्मान देण्याची विनंती – माजी मंत्री सुबोध सावजी

Today Buldhana News

बुलढाणा न्यूज : आपल्या स्पष्टवक्तेपणा, जनहिताच्या मुद्यांवरील ठाम भूमिका आणि प्रामाणिक प्रशासनाला पाठबळ देण्यासाठी ओळखले जाणारे माजी मंत्री सुबोध सावजी   Subodh Savji हे नेहमीच कुठल्या न कुठल्या चर्चेत नेहमीच असतात तसेच त्यांनी केलेली आंदोलने देखील अनोखे असतात आता सुबोध सावजी हे थेट राष्ट्रपतींशी पत्र व्यवहार करत असतात असाच एक प्रकार आता पुढे आला आहे. त्यांनी थेट राष्ट्रपतींकडे केली आहे की, महाराष्ट्रातील कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळख असलेले आयुक्त तथा अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी तुकाराम मुंडे यांना राष्ट्रपती सन्मान देण्यात यावा, अशी विनंती त्यांनी राष्ट्रपतींना पाठविलेल्या पत्राद्वारे केली आहे.

माजी मंत्री सावजी यांनी आपल्या पत्रात तुकाराम मुंडे यांच्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेकडे लक्ष वेधले आहे. गेल्या सुमारे २९ वर्षांच्या कारकिर्दीत मुंडे यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम करताना प्रशासनात पारदर्शकता आणि शिस्त प्रस्थापित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. या काळात त्यांची तब्बल २४ वेळा बदली झाली असली, तरी त्यांच्या कामकाजावर कधीही भ्रष्टाचार, अनियमितता किंवा निष्काळजीपणाचे आरोप झाले नसल्याचे माजी मंत्री सुबोध सावजी यांनी नमूद केले आहे.

पत्रात पुढे म्हटले आहे की, तुकाराम मुंडे Tukaram Munde यांनी ज्या-ज्या ठिकाणी काम केले, त्या ठिकाणी भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी कठोर निर्णय घेतले. अनेकदा त्यांच्या कार्यपद्धतीमुळे काही हितसंबंधांना धक्का बसला, मात्र त्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता प्रामाणिकपणे कर्तव्य बजावले. त्यामुळेच त्यांना वारंवार बदलीचा सामना करावा लागल्याचेही माजी मंत्री सुबोध सावजी यांनी स्पष्ट केले आहे.

सध्या अन्न व औषध प्रशासन विभागात कार्यरत असलेल्या मुंडे यांनी विभागातील कामकाज अधिक पारदर्शक करण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी विभागातील एका अधिकार्‍याला लाच घेताना अटक झाल्यानंतर त्यांनी प्रशासनातील त्रुटी दूर करण्यासाठी कठोर भूमिका घेतली. त्यांच्या या कामगिरीमुळे सर्वसामान्य नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाल्याचे माजी मंत्री सुबोध सावजी यांनी पत्रात नमूद केले आहे.

तुकाराम मुंडे यांच्यासारख्या प्रामाणिक आणि निष्ठावान अधिकार्‍यांचा सन्मान केल्यास देशातील प्रशासकीय यंत्रणेसमोर एक आदर्श निर्माण होईल, असे मतही सावजी यांनी व्यक्त केले आहे. तसेच भविष्यात त्यांची बदली झाल्यास त्यांना महाराष्ट्राच्या गृह विभागात वरिष्ठ आणि महत्त्वाच्या पदावर नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

या मागणीमागे कोणताही वैयक्तिक संबंध नसून केवळ तुकाराम मुंडे यांच्या कार्याची दखल घेऊनच हे पत्र पाठविल्याचे माजी मंत्री सुबोध सावजी सावजी यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रपतींनी या मागणीचा गांभीर्याने विचार करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

पेपर खरेदी करणार्‍या पालकांची यादी सीबीआयकडे तयार?

काँग्रेसच्या आसूडची वेळ चुकली

Buldhana News
Author: Buldhana News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

best news portal development company in india
और देखें