best news portal development company in india

जागतिक फुटबॉल दिनाचे आयोजन

SHARE:

बुलढाणा न्यूज
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य , पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ,बुलढाणा व ब्राईट क्रीडा व बहुउद्देशीय संस्था, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक फुटबॉल दिनाचे आयोजन संपन्न. बुलढाणा जिल्हा मध्ये फुटबॉल या खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा, लहान वयोगटातील खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म व सुप्त गुणांना वाव मिळावा, त्यांच्या मध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी म्हणून दिनांक २१ ते २५ मे ,२०२६ दरम्यान जिल्हा क्रीडा फुटबॉल प्रशिक्षण केंद्र ,जिजामाता क्रीडा संकुल ,बुलढाणा येथे वयोगट १३ वर्ष खालील मुलांच्या फुटबॉल साखळी सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा क्रीडा फुटबॉल प्रशिक्षण केंद्राच्या ४५ तर शारदा ज्ञानपीठ शाळेच्या २५ खेळाडूंनी सहभाग नोंदविला तर जिल्हातील एकूण ७० खेळाडूंनी ६ संघा मध्ये सहभाग घेतला होता.

२० मे २०२६ रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी ,बुलढाणा श्रीमती भक्ती आंब्रे , तालुका क्रीडा अधिकारी श्री .बी. एस. महानकर व श्री. प्रशांत मंडले यांच्या शुभहस्ते स्पर्धाच्या टिशर्ट , ट्रॉफी व World Football Day celebration जागतिक फुटबॉल दिन लोगोच्या फ्रेम चे अनावरण करण्यात आले . स्पर्धे मध्ये सहभाग घेणार्‍या सहा संघाना व प्रशिक्षकांना टिशर्ट चे वाटप करण्यात आले . प्रमुख अथितीनि स्पर्धा मध्ये सहभाग घेणार्‍या संघाना शुभेच्छा दिल्या व २१ मे २०२६ पासून स्पर्धेला सुरवात झाली . २४ मे पर्यंत साखळी सामन्याचे आयोजन करण्यात आले व २५ मे रोजी सकाळी तृतीय क्रमांकाचा व सायंकाळी प्रथम क्रमांकाच्या सामन्याचे आयोजन करण्यात आले. स्पर्धे मध्ये एकूण १६ सामन्याचे आयोजन पाच दिवसामध्ये करण्यात आले . या स्पर्धे मध्ये खेळाडूंनी आपले कौशल्य पणाला लावत बुलढाणा जिल्हात फुटबॉल मय वातावरण निर्माण केले तर जिल्हातील प्रेक्षकांनी उपस्थित राहून खेळाडूंचे मनोबल वाढविले.

स्पर्धेच्या बक्षिसं वितरणा करीता प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी, बुलढाणा श्रीमती भक्ती आंब्रे , राज्य क्रीडा मार्गदर्शक श्रीमती उज्वला लांडगे , अध्यक्ष बुलढाणा जिल्हा फुटबॉल संघटना श्री एस एस ठाकरे ,सचिव बुलढाणा जिल्हा फुटबॉल संघटना श्री एन आर वानखडे, उपमुख्याध्यापक उर्दू हायस्कूल ,बुलढाणा श्री दाऊद सर, उपाध्यक्ष ब्राईट क्रीडा व बहुउद्देशीय संस्था श्री संजय भंडारी , कोषाध्यक्ष ब्राईट क्रीडा व बहुउद्देशीय संस्था श्री राजकुमार श्रीवास्तव उपस्थित होते . उपस्थित सर्व प्रमुख अतिथींचा जागतिक फुटबॉल दिन लोगोची फ्रेम देऊन सन्मान करण्यात आला , तर श्रीमती उज्वला लांडगे , श्री दाऊद सर, व श्री एन आर वानखडे यांनी उपस्थित खेळाडू ,माजी खेळाडू व पालक याना मोलाचे मार्गदर्शन केले व फुटबॉल या खेळाचे महत्व पटवून दिले . बुलढाणा जिल्हा मध्ये फुटबॉल या खेळाच्या विकासा करीता ज्यांनी मोलाचे योगदान दिले अश्या माजी फुटबॉल खेळाडूंचा जागतिक फुटबॉल दिन लोगोची फ्रेम देऊन सत्कार करण्यात आला .

या स्पर्धे मध्ये प्रथम क्रमांक बालाजी फुटबॉल क्लब बुलढाणा , दुसरा क्रमांक जिल्हा क्रीडा फुटबॉल प्रशिक्षण केंद्र,बुलढाणा व तृतीय क्रमांक बुलढाणा फुटबॉल क्लब, बुलढाणा या संघानी प्राप्त केला तर उत्कृष्ट खेळाडू म्हणून मोहम्मद उजैर रमीज राजा , नंदराज, सुलेक खान इरफान खान , फरहान ,वेदांत , देवांश ,अम्मार यांचा सन्मान करण्यात आला . विजयी संघाना चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धे मध्ये सहभाग घेतलेल्या सर्व खेळाडूंना मेडल देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्याकरिता पंच म्हणून श्री अर्जुन दाडगे, श्री प्रेम सोनवणे , श्री अंश अवसरमोल , श्री गौरव वाघमारे तर वैद्यकीय पथक म्हणून शासकीय रुग्णालयाचे डॉ. श्री. गायकवाड, श्री. दीपक नांदे यांनी कामकाज बघितले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्य क्रीडा मार्गदर्शक डॉ. जीवन मोहोड तर आभार प्रदर्शन सचिव ,ब्राईट क्रीडा व बहुउद्देशीय संस्था श्री. मनोज श्रीवास यांनी केले. स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्याकरिता श्री. सुनील जोशी ,श्री. मुकेश बाफना , श्री.मोहम्मद रमीज राजा ,श्री. राणा ओशलकर श्री. मनोज श्रीवास, डॉ. श्री.जीवन मोहोड यांनी परिश्रम घेतले .

अनैतिक व्यवसायांनी मलकापूरची प्रतिमा मलिन

चिखली शहर काँग्रेसने स्मार्ट मीटर सक्तीविरोधात आंदोलन

Buldhana News
Author: Buldhana News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

best news portal development company in india
और देखें