दोन महिला व दोन पुरुष संशयित पोलिसांच्या ताब्यात
अनैतिक व्यवसाय करणार्या अड्ड्यांवर प्रभावी मोहीम राबवली जाणार का?
या प्रकारांमुळे शहरातील तरुणांवर विपरीत परिणाम होत असल्याची भावना सामाजिक स्तरातून व्यक्त होत आहे. काही कुटुंबांवरही याचे गंभीर सामाजिक परिणाम झाल्याचे बोलले जात असून, शहराच्या सामाजिक वातावरणावर याचा परिणाम होत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. यानंतरही अनैतिक व्यवसाय करणार्या अड्ड्यांवर प्रभावी मोहीम राबवली जाणार का? असा प्रश्न मलकापूर शहर वासियांकडून विचारल्या जात आहे.
बुलढाणा न्यूज
मलकापूर शहरातील वाकोडी परिसरात अनैतिक व्यवसाय सुरू असल्याचा संशय असलेल्या अनैतिक व्यवसाया वर बुलडाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे संबंधित व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये चर्चांना उधाण आले आहे.
मलकापूर शहरातील काही भागांमध्ये अनेक दिवसांपासून अनैतिक व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी व चर्चा नागरिकांमध्ये सुरू होत्या. मात्र, या प्रकारांवर प्रभावी आणि सातत्यपूर्ण कारवाई होत नसल्याची नाराजीही व्यक्त केली जात होती. दरम्यान, गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाकोडी परिसरातील एका संशयित ठिकाणी छापा टाकत कारवाई केली. या कारवाईदरम्यान दोन महिला व दोन पुरुष अशा चार
संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत पंचनामा व चौकशीची प्रक्रिया सुरू असल्याने संबंधितांची नावे अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आली नव्हती. दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणातील विविध बाबींची पडताळणी सुरू आहे.
जिल्हा परिषद आरोग्य कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आमदार श्वेता महाले यांचा पुढाकार







