ओबीसी समाजातील एकतेचा अभाव हा मोठा प्रश्न
कोणीही दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर तो आम्ही सहन करणार नाही. आमचा छत्रपतींना विरोध नाही; मात्र त्यांच्या नावाखाली निर्माण होणारी दहशत आम्ही खपवून घेणार नाही, असे प्रा. लक्ष्मण हाके म्हणाले. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी ६ मे २०१० रोजी जातनिहाय जनगणनेची मागणी केली होती, मात्र त्यानंतर ही मागणी मागे पडली, असेही त्यांनी नमूद केले.
बुलढाणा न्यूज
सिंदखेड राजा : ओबीसी समाजात एकी नसल्यामुळे आपल्या मागण्या शासनाकडून मान्य होत नाहीत. गावगाड्यातील अठरापगड जातींनी एकत्र येऊन जातनिहाय जनगणनेसाठी मोठा लढा उभारावा, असे आवाहन ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी केले. सोयंदेव येथे गुरुवार, २२ मे रोजी ओबीसी जनगणना एल्गार सभा झाली. यावेळी ते बोलत होते. ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना व्हावी, या मागणीसाठी राज्यभर शंभर सभांचा एल्गार पुकारण्यात आला असून, या अभियानाची सुरुवात सोयंदेव येथून करण्यात आली.
यावेळी नवनाथ वाघमारे, बटुळे बाबा, विनोद वाघ, डॉ. सुनील कायंदे, सविताताई मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रा. हाके यांनी भाषणात राज्य सरकार आणि विविध राजकीय घडामोडींवर टीका करत ओबीसी समाजातील एकतेचा अभाव हा मोठा प्रश्न असल्याचे सांगितले. हा देश आपला, हे राज्य आपले; मग आपण बेदखल का? कारण आपण एकसंघ नाही, असे ते म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९४६ मध्ये जातनिहाय जनगणनेची मागणी केली होती. इंग्रजांच्या काळात जनगणना झाली; मात्र त्यानंतर जातनिहाय जनगणना झालेली नाही. शासन केवळ आश्वासने देत असून अद्यापही यासंदर्भातील शासन निर्णय काढलेला नाही, असा आरोप त्यांनी केला. जातनिहाय जनगणना नसल्यामुळे ओबीसी आरक्षण जवळपास संपुष्टात येण्याच्या स्थितीत असल्याचा दावा करीत प्रा. हाके म्हणाले, बोगस ओबीसी प्रमाणपत्रांच्या आधारे अनेक जण मोठ्या पदांवर पोहोचले, तर खरा ओबीसी समाज आरक्षणापासून वंचित राहिला आहे. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, शिष्यवृत्ती आणि विविध योजनांचा अभाव असल्याचे सांगत त्यांनी निवडून आलेले ओबीसी लोकप्रतिनिधी समाजाचे प्रश्न प्रभावीपणे मांडत नसल्याची खंत व्यक्त केली.
कार्यक्रमाचे आयोजन दीपक कायंदे पाटील यांनी केले. सूत्रसंचालन माऊली शिरसाठ तर आभार प्रदर्शन दीपक पाटील यांनी केले. यावेळी सरपंच रुक्मिणीबाई इलग, सर्जेराव खरात, राम जावळे, अण्णा खरात, गजानन खरात, रमेश खरात, बी. डी. खरात, प्रल्हाद खरात, उद्धव नागरे, देवानंद नागरे, दत्तात्रय जावळे, गणेश खरात, राधाकृष्ण खरात, गणेश इलग, कैलास इलग, ज्ञानेश्वर कायंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. जरांगेंच्या आंदोलनावर टीका सभेत बोलताना प्रा. हाके यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावरही टीका केली.
राजकीय नेत्यांच्या भेटींमुळे विशिष्ट आंदोलनांना बळ
काँग्रेस-भाजपने केली नाही जनगणना नवनाथ वाघमारे यांनी केंद्र सरकारवर टीका करत काँग्रेस असो किंवा भाजप, दोन्ही पक्षांनी ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना केली नाही, असा आरोप नवनाथ वाघमारे यांनी केला. तसेच काही राजकीय नेत्यांच्या भेटींमुळे विशिष्ट आंदोलनांना बळ मिळत असल्याचेही त्यांनी म्हटले. यावेळी बटुळे बाबा, विनोद वाघ, डॉ. सुनील कायंदे आणि सविता मुंडे, प्रा. सिद्धेश्वर आंधळे यांनीही ओबीसी जनगणना तातडीने करण्याची भूमिका मांडली.राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नव्या चेहर्यांना संधी मिळण्याची शक्यता
https://buldhananews.in/archives/15875







