- अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
- २० शेतकर्यांची १ हजार ६६० फूट केबल चोरीला
लोणार तालुक्यातील हिरडव शिवारातील वागडव धरणावरून पळसखेड, हिरडव, आरडव, दाभा येथील २० शेतकर्यांच्या मोटारपंपाची ६ लाख ६ हजार ४०० रुपयांची केबल चोरीस गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हिरडव ते जाफ्राबाद रोडवरील हिरडव शिवारातील वागडव हे धरण हिरडव व जाफ्राबाद रस्त्यालगतच आहे. या धरणावरून हिरडव, आरडव, दाभा, जाफ्राराबाद पळसखेड इत्यादी गावातील शेतकर्यां च्या पाईपलाईन आहेत. सद्यः स्थि तीत रब्बी चा हंगाम जवळपास आटोपला असून, पळसखेड, हिरडव, आरडव, दाभा येथील शेतकर्यां नी टोळकांदा व उन्हाळी मूग हे पीक पेरले आहे. त्यासाठी मोटारपंप धरणावर ठेवले असून, तीन दिवसांपासून शेतातील वीजपुरवठा खंडित झाला होता. परिसरात १९ मार्चच्या रात्री विजेच्या कडकडासह वारा सुटला होता. त्यामुळे शेतकरी शेतात गेले नाहीत. २० मार्च रोजी माणिकराव जायभाये यांनी सकाळी धरणावर जाऊन पाहिले असता मोटारपंपाची केबल दिसली नाही.
त्यामुळे त्यांनी इतर शेतकर्यांशी संपर्क साधला असता. या दरम्यान २० शेतकर्यांची १ हजार ६६० फूट केबल चोरीला गेल्याचे समोर आहे. त्यामुळे शेतकर्यांचे ६ लाख ६ हजार ४०० रुपयांचे नुकसान झाले. याबाबत शेतकर्यां नी दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन निरीक्षण केले. या घटनेत यामध्ये माणिकराव जायभाये, विष्णू पोफळे, ज्ञानेश्वर काळबांडे, विश्वनाथ सानप, ज्ञानेश्वर तारे, लक्ष्मण घुगे, सुभाष सांगळे, लक्ष्मण जायभाये, लिंबाजी सांगळे, अरुण ढवळे, अशोक सांगळे, बद्री मुंडे, वैभव गाडे, नंदू मुंडे, जनार्दन मोरे, पुरुषोत्तम मैराळ, संतोष साठे व विलास मुंडे या शेतकर्यां चे आर्थिक नुकसान झाले आहे. या प्रकरणी कैलासराव जायभाये यांनी लोणार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्रधानमंत्री सूर्य घर योजनेचा लाभ घरकुल लाभार्थ्यांनी घ्यावा – गटविकास अधिकारी मुकेश माहोर







