best news portal development company in india

वांग्याच्या उभ्या पिकामध्ये अफूच्या झाडांची लागवड

SHARE:

मिशन परिवर्तन – शेतात अवैध अफूची लागवड करणार्‍या एकास पकडले

अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील मेरा शिवारात कृष्णा हरीराम वाघमारे रा.मेरा खुर्द याने स्वतःचे शेतामध्ये अवैधरित्या व विनापरवाना अफूच्या झाडांची लागवड व संगोपन करुन, अफूची चोरटी विक्री करण्याच्या उद्ददेशाने ताब्यामध्ये बाळगून आहे. या माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस स्टेशन अंढेरा हद्दीत ग्राम मेरा शिवारातील गट नं. २०३ मधील कृष्णा हरीराम वाघमारे यांचे शेतामध्ये बुधवार, २५ मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथकाला गोपनीय माहिती यावरुन कारवाई केली. यामध्ये पंचा समक्ष रेड केली असता, सदर शेतामध्ये आरोपी याने वांग्याच्या उभ्या पिकामध्ये अफूच्या झाडांची लागवड, संगोपण व साठवणूक केली असल्याचे दिसून आले.

या कारवाईत आरोपी कृष्णा हरीराम वाघमारे वय २६ रा.मेरा खुर्द ता. चिखली जि.बुलढाणा यांचे ताब्यातून ओलसर मादक अफूची बोंडे ओलसर झाडे वजन ११ किलो ४७९ ग्रॅम, अंदाजे किंमत ९ लाख १८ हजार ३२०रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरुध्द पोलीस स्टेशेन अंढेरा येथे अंमली औषधीद्रव्ये व मनः प्रभावी पदार्थ अधिनियम कलम ८ (क), १८ (क) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पो.स्टे. अंढेरा करीत आहेत.

ही कार्यवाही निलेश तांबे पोलीस अधीक्षक बुलढाणा यांचे आदेशान्वये श्रेणिक लोढा, अपर पोलीस अधीक्षक खामगांव, श्री. अमोल गायकवाड-अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा, श्रीमती मनिषा कदम उपविपोअ. देऊळगांव राजा यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. श्री. सुनिल अंबुलकर स्था.गु.शा. बुलढाणा यांचे नेतृत्वात पोउपनि. अविनाश जायभाये, अडख राजकुमार राजपूत, पोहेकॉ. दिपक लेकुरवाळे, गजानन दराडे, गणेश पाटील, शेख चाँद, युवराज राठोड, मपोहेकॉ. वनिता शिंगणे, पोकॉ. गजानन गोरले, विक्की इंगळे, मपोकॉ. कोमल इंगळे नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा-बुलढाणा तसेच सपोनि. रुपेश शक्करगे व पोलीस स्टाफ पो.स्टे. अंढेरा यांच्या पथकाने केली.

बुलढाणा जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी मिशन परिवर्तन
पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचे संकल्पनेतून राबविण्यात येत आहे. सदर अनुषंगाने जिल्ह्यात अफू, गांजा व ईतर तत्सम अंमली पदार्थांची वाहतूक, साठवणूक, उत्पादन व विक्री करणार्‍यांचा शोध घेऊन त्यांचेवर कायदेशीर कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेशीत केले होते.

Sadhna Thorat
Author: Sadhna Thorat

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *