best news portal development company in india

जेलमध्ये जावे लागले, तरी चालेल..पण काँग्रेस विचार सोडणार नाही: संदिप शेळके

SHARE:

चिखली : येथील हिरकणी महिला अर्बनमध्ये काँग्रेस तालुकानिहाय बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना संदिप शेळके म्हणाले की, लोक मला विचारत आहेत, तुमच्या बँका आहेत, त्रास होणार नाही का ? तर मी त्यांना सांगतो की, आमच्या पूर्वजांनी इंग्रज राजवटी सारखा कठीण त्रास सोसला. आता तर सर्व सुविधा आहेत. त्यामुळे जेलमध्ये जावे लागले, तरी चालेल… पण काँग्रेस विचार सोडणार नाही.

पुढे बोलतांना संदिप शेळके म्हणाले की, माजी आमदार दिवंगत बाबुराव पाटील, उत्तमराव पाटील यांचा नातू असल्यामुळे जुन्या विचारांशी, पक्षाशी मी पुन्हा जुळलो. मला लोक विचारतात की, तुम्ही आता जिल्हाध्यक्ष होणार का? मी सर्वांना ठामपणे सांगत आहे, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या आदेशाने मी संवाद यात्रा सुरु केली असून मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही, फक्त काँग्रेस पक्ष वाढीसाठीच अहोरात्र झटणार, असल्याचा निर्धार काँग्रेसनेते संदिप शेळके यांनी व्यक्त केला.

यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रामभाऊ जाधव, न.प.विरोधी पक्षनेते डॉ. मोहमंद इसरार, सचिन बोंद्रे, अतहरोद्यीन काझी, पर्यावरण सेलचे विजु पाटील शेजोळ, नगरसेवक गोपाल देव्हडे, जक्का भाई, गोकुळ शिंगणे, रत्नदिप शिनगारे, प्रशांत भटकर, समाधान सुपेकर, पांडुरंग पाटील भुतेकर, खलील बागवान, शेख खैरू, ईश्वराव इंगळे, जीवनबापु देशमुख, शिवराज पाटील, शेषराव अंभोरे, अशोक झगरे, रामधन मोरे, कापडसिंग पाटील, गणेश जवंजाळ, समाधान आकाळ, गणेश ठेंग, विजय वाघमारे सर, भास्कर चांदोरे, समाधान गिते, प्रविण, पाटील, राहुल चवरे, डॉ.संजय घुगे, रवि लोखंडे, संजुकाका बाहेकर, रूपेश घोलप, विजय महाजन, श्रीकृष्ण अंभोरे यांच्यासह शेकडो काँग्रेस पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.

काही दिवसांतच संदिप शेळके झाले काँग्रेसनेते…

मागील काही दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली.यामध्ये संदीप शेळके यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यांनी पूर्वीच्या उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा राजीनामा देत काँग्रेसचा हात धरला आहे. मुंबईत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. शेळके यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यात काँग्रेसला मोठी ताकद मिळाल्याचे मानले जात आहे.
तसेच संदीप शेळके यांनी वन बुलढाणा मिशनचे प्रणेते म्हणून ओळख असलेल्या संदीप शेळके यांनी काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत पक्षासाठी पूर्ण ताकदीने काम करण्याचा निर्धार केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, आगामी निवडणुकांमध्ये ते काँग्रेसचे मजबूत चेहरा ठरू शकतात, अशी काँग्रेसच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

 

Sadhna Thorat
Author: Sadhna Thorat

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *