best news portal development company in india

वाचन बँकेच्या माध्यमातून निपुन होवूया या नवोपक्रमास जिल्हयात मानांकन

SHARE:

उपक्रमशील शिक्षक महेंद्र काकड यांचा उपक्रम

अकोला : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे मार्फत आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा २०२६ मध्ये जि.प.शाळा पोपटखेडचे उपक्रमशील शिक्षक महेंद्र सुभाषराव काकड यांच्या वाचन बँकेच्या माध्यमातून निपुन होवूया या नवोपक्रमास जिल्हयात मानांकन मिळाले असुन आदिवासी बहुल भागातील भाषीक विद्यार्थी मुख्य प्रवाहात यावे हा या भाषिक नवोपक्रमाचा उद्देश आहे.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या श्रीमती रत्नमाला खडके यांच्या अध्यक्षतेखाली जेष्ठ अधिव्याख्याता अंकोश ससाने व राजेंद्र अजगर यांच्या मूल्यांकनात राज्यस्तरापर्यंतच्या विविध फेर्‍यात नवोपक्रम पोहचला आहे. महेंद्र काकड उपक्रमशील शिक्षक असुन विविध स्तंभलेखक तथा कवी आहेत. शालेयस्तरावर विवध प्रशासकीय जबाबदार्‍या पार पाडतांना जि.प.शाळा पोपटखेड येथे शालेय परसबाग त्यांनी फुलवली आहे. सदर नवोपक्रमा करीता गटशिक्षणाधिकारी मधुकरराव सुर्यवंशी तसेच विस्तार अधिकारी गजाननराव सावरकर यांचे मार्गदर्शन लाभले. महेंद्र काकड यांच्या यशाबद्दल जि. प. शाळा पोपटखेडच्या मुख्याध्यापिका दिपा अवताडे तथा शिक्षक नितीन तराळे, प्रशांत धाबे, कु.रूपाली सोनटक्के, कु.अर्चना खाडे,कु.कविता गिरी,कु.विद्यावती राजपुत यांनी कौतुक केले.

Sadhna Thorat
Author: Sadhna Thorat

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *