best news portal development company in india

२१ मार्च रोजी श्री संत सावता माळी क्रिकेट प्रीमियर लीग २०२६ चा बक्षीस वितरण सोहळा

SHARE:

  • राहुल बोंद्रे ,स्वाती वाकेकर, दीपक देशमाने यांची विशेष उपस्थिती

  • उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर आणि उदयोन्मुख खेळाडू यांनाही विशेष पुरस्कारांनी गौरविण्यात येणार

चिखली : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुरू झालेल्या श्री संत सावता माळी क्रिकेट प्रीमियर लीग २०२६ या बहुचर्चित क्रिकेट स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण सोहळा २१ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता चिखली येथील जिल्हा परिषद मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या बक्षीस वितरण सोहळ्याला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे, जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेस पक्षाच्या प्रमुख स्वाती वाकेकर, काँग्रेस सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष दीपक देशमाने यांची विशेष उपस्थिती लाभणार असून त्यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना आकर्षक पारितोषिके, ट्रॉफी व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहेत. याशिवाय उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर आणि उदयोन्मुख खेळाडू यांनाही विशेष पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे.


या स्पर्धेमध्ये एकूण ८ संघांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये प्रथमेश-११ (अनिल जैवाळ), डीके बॉईज ११ (दीपक खरात), भूमिपुत्र-११ (विलास घोलप )नन्हाई स्ट्रायकर्स (विलास नन्हई), श्री कार्डेकोर (स्वप्नील खरात), एएस रॉयल्स (मंगेश जागृत/रोहन मेहेत्रे), सातपुडा स्ट्रायकर्स (शैलेश भराड) आणि श्रीराम-११ (समाधान बांडे) या संघांचा सहभाग आहे. प्रत्येक संघात १४ खेळाडूंचा समावेश असून व्यावसायिक, राजकीय, शैक्षणिक, डॉक्टर, इंजिनिअर, वकील, शेतकरी, व्यापारी, पत्रकार अशा विविध क्षेत्रातील मान्यवर या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. प्रत्येक संघात स्थानिक तसेच अनुभवी खेळाडूंचा समावेश असल्यामुळे सामने अत्यंत चुरशीचे व रोमांचक ठरत आहे. प्रथम पारितोषिक योगेश जाधव यांच्या वतीने २१ हजार तर द्वितीय बक्षीस दीपक भाऊ देशमाने यांच्यावतीने ११ हजार रुपये असणार आहे.

या बक्षीस वितरण सोहळ्याला पप्पू सेठ हरलालका, माजी नगराध्यक्ष, सौ.प्रिया कुणाल बोंद्रे माजी नगराध्यक्षा डॉ.मोहम्मद इसरार विरोधी पक्षनेता, नगरसेवक मोहम्मद आसिफ, उबेद अली खान, रत्नदीप शिनगारे, नगरसेविका सौ सरस्वती वायाळ, श्रीमती सुनिता शिंगणे, सौ.स्वाती अमोल लहाने, सौ सीमा गोपाल देव्हडे, सौ शितल संतोष देशमुख, सौ संध्या आनंद बोंद्रे, वहिदा बेगम मोहम्मद जकाऊल्ला, सौ सुप्रिया प्रशांत भटकर यांची उपस्थिती राहणार आहे.या समारोप सोहळ्यासाठी सर्व क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक समितीने केले आहे.

Sadhna Thorat
Author: Sadhna Thorat

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *