अंधश्रद्धेचा विळखा
भक्तीच्या नावाखाली बाजार मांडलाय
धर्माच्या बुरख्याआङ व्यभिचार दडलाय…
कुणी भोदू खरात होतो,देव होतो कुणी
भोळे सावज टिपण्यासाठी लावतो धुनी…
अंतरीच्या दुःखाने पिळलेली असते नारी
तिलाच आपले भक्ष बनवते भोंदूची स्वारी…
दरबारात असते वरून किर्तन आतून तमाशा
चतुर कोळी बनून तो गळाला लावतो माशा…
सावध व्हा भक्तांनो सोडा अघोरी अंधश्रद्धा
देशाच्या प्रगतीला आहे हीच मोठी बाधा…
चला वाचवू समाजाला भोंदूच्या विळख्यातून
प्रबोधनाने,लेखणीने, अन्यायाला काढू ठेचून..

रमेश खंडारे, संपादक
साप्ता. स्वाभिमानी बुलडाणा
मो. 9822508833
बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी धमकी दिलेले प्रशांत आंबी कोण आहेत?





