जिल्हा अध्यक्षपदी उदय सोनी तर संघटन मंत्रीपदी खामगावचे जगदीश नावंदर
बुलढाणा जिल्हा माहेश्वरी माहेश्वरी समाजाच्या पदाधिकार्याची नुकतीच मेहकर येथील महेश सेलिब्रेशन येथे जिल्हास्तरीय बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महेश परिवारचे प्रमुख डॉ.सुभाष लोहिया हे हजर होते.
या वेळी मंचावर पूर्व जिल्हाध्यक्ष संजय सातल, डॉ.किशोर केला, मदन मालपाणी, अनिल नावंदर, डॉ.विजय टावरी, पवन लड्ढा, डॉ.गोविंद झंवर, डॉ.सुभाष भूतड़ा, कमलेश राठी, प्रा.अशोक सारडा, संजय मूंदड़ा, हे जिल्ह्यातून आलेले समाजाचे मान्यवर हजर होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी महेश भगवान यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या वेळी सर्वानुमते माहेश्वरी समाजाचे जेष्ठ उदय सोनी मेहकर यांची माहेश्वरी समाजाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली व जिल्हा सचिवपदी नांदुरा येथील देवेश नवगजे यांची निवड करण्यात आली. कोषाध्यक्ष शैलेश राठी शेगाव, संघटन मंत्री
जगदीश नावंदर खामगाव, प्रचार मंत्री पंकज टावरी मलकापूर, उपाध्यक्ष म्हणून पवन लढा चिखली, ललित चांडक जळगाव जामोद, व दामोदर राठी संग्रामपूर यांची निवड करण्यात आली तसेच सहसचि व म्हणून देऊळगाव राजा येथील राजकुमार काबरा, बुलढाणा येथील पवन बजाज, व लोणार येथील बद्री नारायण बाहेती ह्या मान्यवरांची माहेश्वरी समाजाच्या जिला कार्यकारिणीवर पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर पवन मंत्री व अॅड. ओम राठी यांनी केले. बुलढाणा जिल्ह्यातील तेरा तालुक्यातील जवळपास २०० च्या वरती माहेश्वरी समाजाचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित सर्व पदाधिकार्यांनी माहेश्वरी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व युवकांच्या सहभागासाठी व माहेश्वरी समाजाचे संघठन मजबूत करण्यावर या बैठकीमध्ये भर देण्यात आला.







