हौशी खगोल अभ्यासक विजय म. गिरुळकर व प्रविण गुल्हान यांची माहिती
अमरावती- कोणी साथीला राहो न राहो सावली मात्र आयूष्य भर माणसाची साथ करते. असे नेहमी म्हटले जाते. मात्र ही सावली २५ मे रोजी दुपारी १२ ते १२.३० या दरम्यान ५२ सेकंदाकरिता आपली साथ सोडणार आहे. हा खगोलीय चमत्कार अमरावतीकरांना प्रत्यक्ष अनुभवाला मिळणार आहे. पृथ्वीवर मकर वृत्ताच्या दक्षिणेकडच्या भागात तर कर्कवृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधिच डोयावर येत नाही. तो सदैव उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे दिसतो पण या दोन टोकाच्या वृत्तांधल्या लोकांना मात्र वर्षातून दोनदा सूर्य बरोबर डोयावर आलेला अनुभवायला मिळतो.
जेव्हा सूर्य डोयावर आलेला असतो तेव्हा आपली सावली सरळ आपल्या पायाखाली पडते आणि जणू काही ती सावली गायब होते शून्य सावलीचा हा एक रोमांचकारी अनुभव आहे.
अधिक माहिती पाहिजे
खगोलप्रेमी अमरावतीकरांनी २५ मे रोजी दुपारी १२ ते १२.३० या दरम्यान १२ सेकंदाकरिता आपली सावली गायब होण्याचा रोमांचकारी अनुभव प्रत्यक्ष घ्यावा, असे आवाहन मराठी विज्ञान परिषद, अमरावती चे हौशी खगोल अभ्यासक विजय म. गिरुळकर व प्रविण गुल्हाने यांनी केले आहे. या घटनेविषयी अधिक माहिती पाहिजे असल्यास मो.नं. ९६३७३८४८१२ वर संपर्क साधावा.






