best news portal development company in india

काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे नवनियुक्त चेअरमन अनिरुद्ध वनकर यांचा पदग्रहण सोहळा संपन्न

SHARE:

The induction ceremony of Aniruddha Vankar, the newly appointed Chairman of the Congress Scheduled Castes Department, has concluded.

देशात मनुवादी विरुद्ध संविधानवादी अशी सरळ सरळ लढाई – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

मुंबई – मागील १२ वर्षापासून संविधान व लोकशाही पायदळी तुडवली जात आहे आणि याविरोधात आपल्याला खंबीरपणे लढायचे आहे.देशात सध्या लोकशाही व संविधान धोयात आहे. रा. स्व. संघ व भाजपाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान संपवायचे आहे. देशात मनुवादी विरुद्ध संविधानवादी अशी सरळ सरळ लढाई असून या लढाईमध्ये अनुसुचित जातीची भूमिका महत्वाची आहे, ही लढाई आपण सर्वांनी मिळून लढू, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे. काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र काँग्रेसच्या अनुसुचित जाती विभागाचे नवनियुक्त चेअरमन अनिरुद्ध वनकर यांचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसवेक संघाला १०० वर्षे झाली तरी अद्याप या संघटनेची नोंदणी केलेली नाही, त्यांच्या आर्थिक व्यवहाराची माहिती नाही, आणि जी संघटना समाजात विष कालवते, त्या संघटनेचे गुणगान एक आयपीएस अधिकारी गातो, त्या संघटनेला चांगली संघटना म्हणतो, हे अत्यंत गंभीर आहे. देशासमोरचा धोका लक्षात घेऊन संघर्ष करण्याची तयारी ठेवा, असे आवाहन करत हर्षवर्धन सपकाळ यांनी अनिरुद्ध वनकर यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. अनुसुचित जाती विभागाचे माजी चेअरमन सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनाही यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष अ‍ॅड.गणेश पाटील, प्रदेश सरचिटणीस संदेश कोंडविलकर, अनुसुचित जाती विभागाचे माजी चेअरमन सिद्धार्थ हत्तिअंबिरे यांच्यासह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.

पणन महासंघाच्या अध्यक्षपदी रोहित निकम तर उपाध्यक्षपदी राहुल काकडे

बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष यांचा केंद्रीय राज्यमंत्र्यांना सवाल

Buldhana News
Author: Buldhana News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

best news portal development company in india
और देखें