मुंबई : येथील पणन महासंघाच्या मुख्यालयात गुरुवारी सकाळी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत जळगावचे रोहित निकम यांची अध्यक्षपदी आणि राहुल काकडे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. Rohit Nikam appointed Chairman and Rahul Kakade Vice-Chairman of the Marketing Federation. खान्देशातील शेतकरी कुटुंबातून आलेले युवा सहकार नेते रोहित दिलीपराव निकम यांची महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन सहकारी शिखर संस्थेच्या (पणन महासंघ) अध्यक्षपदी तर राहुल काकडे यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाली आहे.
प्रथमच या महत्त्वाच्या सहकारी संस्थेच्या नेतृत्वाची धुरा भारतीय जनता पक्षाशी संबंधित नेतृत्वाकडे आली असून, सहकार क्षेत्रात याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सह निबंधक, सहकारी संस्था मुंबईचे शाहजी पाटील यांनी कामकाज पाहिले. या निवड प्रक्रियेवेळी संस्थेचे संचालक वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, माजी आमदार जयंत पाटील, संचालक संजय पवार, अतुल गण्यारपवार, सुभाष रघातटे, रमेश हिंगणकर, नितीन हिवसे, सुनील चव्हाण, पांडुरंग घुगे, राहुल काकडे, संदीप नरके, प्रमोद रावराणे, आबासाहेब पाटील, बळवंत पाटील, धनश्रीदेवी घाटगे, अयोध्या धस, अशोक हटकर, दत्तात्रय पानसरे यांच्यासह पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक राहुल कुलकर्णी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.







