आरोपीविरुद्ध बोराखेडी पोलीसात गुन्हा दाखल
मोताळा तालुकयातील एका गावात मध्यरात्री घरात घुसून महिलेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तीस वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, १४ ते १५ मे दरम्यान मध्यरात्री दीडच्या सुमारास त्या घराचे दार उघडे ठेवून झोपल्या होत्या. त्यावेळी गजानन जयराम हरमकार हा घरात शिरला व महिलेचा हात पकडून विनयभंग केल्याचा आरोप आहे. महिलने आरडाओरडा करताच आरोपीने शिवीगाळ केली तसेच जीवे मारण्याची धमकी देत घटनास्थळावरून पळ काढल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.







