best news portal development company in india

काँग्रेसच्या सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष रखमाजी राऊत यांनी केले निर्णयाचे स्वागत

SHARE:

रखमाजी राऊत यांनी काय केले होती मागणी ?

नियमांनुसार केरोसीन विक्रीसाठी अधिकृत लायसन्स आवश्यक असताना, पेट्रोल पंपांना केरोसीन वाटपाचा अधिकार देणे योग्य नाही, या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी रिटेल व होलसेल केरोसीन विक्रेत्यांनाच परवाने देण्यात यावेत, सरकारने केरोसीन विक्रेत्यांचे लायसन्स तात्काळ नूतनीकरण करुन द्यावे, अशी मागणीही रखमाजी राऊत यांनी केली होती.

बुलढाणा- महाराष्ट्र राज्यात केरोसिन वितरण करण्याची बाब शासनाच्या विचारधीन आहे. त्या अनुषंगाने केरोसिन परवान्याचे सुलभतेने नुतनीकरण व मंजुरी देण्याचा शासनाने निर्णय घेतला. या निर्णयाचे स्वागत काँग्रेसच्या सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष रखमाजी राऊत यांनी केले आहे.
महाराष्ट्रभर केरोसीन विक्रेत्यांचे लायसन्स थांबवून चिल्लर केरोसीन विक्री बंद केल्यामुळे पारंपरिक केरोसीन विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली होती. या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी लायसन्सधारक विक्रेत्यांचे लायसन्स तात्काळ नूतनीकरण करून त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी गत काही दिवसांपूर्वी रखमाजी राऊत यांनी केली होती. त्यांच्या या मागणीला यश आले असून त्यांनी माध्यम प्रतिनिधी व सरकारचे आभार मानले आहे.

 

Sadhna Thorat
Author: Sadhna Thorat

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *