विश्वशांती बुद्ध विहार तालखेडच्या वतीने श्रामणेर शिबिराचे आयोजन
कमलेश हिवाळे
मोताळा – दहा दिवसीय बौद्धाचार्य श्रामणेर शिबीराचे आयोजन तसेच समता सैनिक दल प्रशिक्षण शिबीर व पंचधातू मूर्ती प्रतिस्थापना सोहळा दि.१ एप्रिल ते १० एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे.
यानिमित्त शिबिरामध्ये बौद्ध धम्म, नैतिक मूल्ये, शिस्त, ध्यान व व्यक्तिमत्व विकास याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. शिबिरात सहभागी होणार्या श्रामणेरांना अनुभवी बौद्धाचार्यांकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या शिबिराची सुरुवातीला दि. १ एप्रिल रोजी एक दिवसीय समता सैनिक दल प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले असून, या शिबिरामध्ये संघटन कौशल्य, शिस्त, सामाजिक कार्य व नेतृत्व विकास यावर विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे.
याचबरोबर दि. १० एप्रिल २०२६ रोजी गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पंचधातूंच्या मूर्तीची विधिवत प्रतिस्थापना करण्यात येणार आहे. हा सोहळा मोठ्या उत्साहात व मंगलमय वातावरणात पार पडणार आहे.तरी तालखेड परिसरातील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विश्वशांती बुद्ध विहार तालखेड आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांमुळे समाजात बंधुता, समता व एकात्मता वाढीस लागेल, असा विश्वास तालखेड येथील आयोजकांनी व्यक्त केला आहे.






