best news portal development company in india

प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलचा सोमवारी लावणीचा ठसका

SHARE:

मनमोहनसिंग चव्हाण यांनी केले आयोजन

https://buldhananews.in
अकोला
प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या बहारदार लावणी कार्यक्रमाचे आयोजन दारव्हा शहरालगतच्या पिंपरी फाटा येथे सोमवारी, दि.३० मार्च २०२६ रोजी मनमोहनसिंग चव्हाण मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे. नागरिकांना सांस्कृतिक मेजवानी मिळावी या उद्देशाने हा भव्य शो आयोजित केला असून, यामुळे परिसरात मोठी उत्सुकता निर्माण झाली असून रसिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

३० मार्च रोजी सायंकाळी पिंपरी फाटा येथे हा कार्यक्रम रंगणार असून, परिसरातील नागरिकांसाठी ही एक मोठी मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे. महाराष्ट्रभर आपल्या ठसकेबाज लावणी सादरीकरणामुळे चर्चेत असलेल्या गौतमी पाटील यांच्या गौतमी पाटील ग्रॅन्ड शो या कार्यक्रमाची दारव्हा परिसरात मोठी चर्चा आहे. मनमोहनसिंग चव्हाण मित्र परिवाराच्या वतीने या कार्यक्रमासाठी सध्या जोरदार पूर्वतयारी करण्यात येत आहे. आयोजक मनमोहनसिंग चव्हाण आणि त्यांच्या मित्र परिवाराने या कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत नेटके केले आहे. लावणीचा हा खास ठसका अनुभवण्यासाठी परिसरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. गौतमी पाटील यांच्या लोकप्रियतेमुळे या कार्यक्रमाला युवकांसह सर्वच थरातील प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.

Sadhna Thorat
Author: Sadhna Thorat

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *