best news portal development company in india

गाळ काढण्याच्या कामाचे सूक्ष्म नियोजन करा- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

SHARE:

बुलढाणा न्यूज : गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत गाळ काढण्याच्या कामासाठी संबंधित विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले. जिल्ह्यात राबविण्यात येणार्‍या या अभियानाचा आढावा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, जिल्हा जलसंधारण अधिकारी, जिल्हा परिषद जलसंधारण अधिकारी, कृषी अधिकारी तसेच विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी सांगितले की, जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरप्रवण क्षेत्रातील गावांची प्रत्यक्ष पाहणी करून त्या भागातील नदी व नाल्यांचे खोलीकरण प्राधान्याने हाती घ्यावे. अपूर्ण राहिलेली कामे तातडीने पूर्ण करण्यावर भर द्यावा. गाळ काढण्याची कामे येत्या १५ दिवसांत स्वयंसेवी संस्थांना देण्यात येतील, असे नियोजन करण्याचेही त्यांनी निर्देशित केले.

गाळमुक्त धरणगाळयुक्त शिवार अभियानामुळे धरणातील साठवण क्षमता वाढून शेतजमिनींची सुपीकता सुधारण्यास मदत होणार आहे. प्रशासनाच्या या उपक्रमामुळे जलसंधारणाला चालना मिळून शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

Sadhna Thorat
Author: Sadhna Thorat

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *