best news portal development company in india

ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांची उबर चषक फायनल्स स्पर्धेतून माघार

SHARE:

भारतीय महिला बॅडमिंटन संघाच्या तयारीला धक्का

नवी दिल्ली : बॅडमिंटनमधील भारताची आघाडीची जोडी असलेल्या ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी आगामी उबर चषक फायनल्स स्पर्धेतून माघार घेतली Trisha Jolly and Gayatri Gopichand withdraw from upcoming Uber Cup Finals आहे. ट्रीसाला घोट्याची दुखापत झाल्यामुळे हा निर्णय भारतीय जोडीला घ्यावा लागला. यामुळे डेन्मार्क येथे होणार्‍या या स्पर्धेपूर्वीच भारताला मोठा धक्का बसला आहे. डेन्मार्कच्या हॉर्सन्स येथे २४ एप्रिल ते ३ मे या कालावधीत थॉमस आणि उबर चषक फायनल्स स्पर्धा होणार आहे. भारतीय पुरुष आणि महिला संघ अ गटात आहेत. यापूर्वी २०२२ मध्ये ऐतिहासिक विजेतेपद पटकावणार्‍या पुरुष संघाचा गतविजेत्या चीन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासह एकाच गटात समावेश आहे. भारतीय महिला संघाचा सामना १६ वेळा विजेतेपद मिळवणार्‍या चीनसह यजमान डेन्मार्क आणि युक्रेनशी होईल.

आशिया अजिंक्यपद स्पर्धेला रवाना होण्याच्या अवघ्या २-३ दिवस आधी दुर्दैवाने ट्रीसाचा पाय मुरगळला. सराव करताना तिचा पाय तिच्या जोडीदाराच्या पायावर पडला आणि हा अपघात झाला, असे भारतीय संघाचा दुहेरीचा Coach B. Sumeet Reddy प्रशिक्षक बी. सुमीत रेड्डीने सांगितले. ट्रीसा सध्या विश्रांती घेत असून लवकरच पुनर्वसन प्रक्रियेतून जाईल. ही दुखापत फार गंभीर नाही आणि ती सुमारे चार आठवड्यांत बरी होईल. मे महिन्याच्या अखेरीस होणार्‍या सिंगापूर खुल्या स्पर्धेतून ती पुनरागमन करू शकेल अशी अपेक्षाही प्रशिक्षक रेड्डी यांनी व्यक्त केली. ट्रीसाच्या खांद्याच्या समस्येमुळे या आघाडीच्या जोडीला गेल्या महिन्यात झालेल्या स्विस खुल्या स्पर्धेतूनही माघार घ्यावी लागली होती.

आता भारतीय बॅडमिंटन महासंघाने उबर चषकासाठी ट्रीसा-गायत्रीच्या अनुपस्थितीत श्रुती मिश्रा आणि प्रिया कोंजेंगबाम यांची दुहेरीतील बदली खेळाडू म्हणून निवड केली आहे. श्रुती आणि प्रिया या २०२३च्या राष्ट्रीय स्पर्धेतील विजेत्या असून सध्या जागतिक क्रमवारीत ४८व्या स्थानावर आहेत.

बुवा तेथे बाया या विषयावर गोवर्धन सभागृहात सोमवारी व्याख्यान

Sadhna Thorat
Author: Sadhna Thorat

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *