best news portal development company in india

मेळघाटच्या विकासपर्वातील एक युग संपले

SHARE:

अमरावती – मेळघाटच्या डोंगरदर्‍यांत, आदिवासी पाड्यांत, शेतकर्‍यांच्या बांधावर आणि सर्वसामान्यांच्या हृदयात आपले वेगळे स्थान निर्माण करणारा एक लोकनेता अखेर काळाच्या पडद्याआड गेला. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार स्व. पटल्या गुरुजी मावस्कर यांच्या निधनाने संपूर्ण मेळघाटावर दुःखाची गडद छाया पसरली असून, जनतेच्या मनातील एक जिव्हाळ्याचा आधारवड कोसळल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. साधी राहणी, प्रामाणिक विचार, निस्वार्थ जनसेवा आणि समाजाप्रती असलेली अपार बांधिलकी यामुळे त्यांनी जनमानसात अढळ स्थान निर्माण केले होते. सत्तेच्या झगमगाटापेक्षा जनतेच्या प्रश्नांना महत्त्व देणार्‍या या लोकनेत्याने आयुष्यभर आदिवासी, शेतकरी, कष्टकरी आणि वंचित घटकांच्या हक्कासाठी संघर्ष केला. मेळघाटातील दुर्ग भागात रस्ते, वीज, पाणी, आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा पोहोचविण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

सोमवारी पहाटे अमरावती येथील चौधरी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि मेळघाटच्या जनतेच्या सुख-दुःखात सदैव सहभागी राहणारे एक सहृदय व्यक्तिमत्त्व अनंतात विलीन झाले. त्यांच्या निधनाची बातमी वार्‍यासारखी पसरताच मेळघाटातील गावागावांत शोककळा पसरली. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले, तर अनेकांच्या ओठांवर एकच वाय उमटले मेळघाटचा खरा माणूस निघून गेला… स्व.पटल्या गुरुजी मावस्कर हे केवळ एक राजकारणी नव्हते, तर ते जनतेच्या वेदना समजून घेणारे, संकटात धावून जाणारे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे नेतृत्व होते.

अनेकांना ते आमदार म्हणून नव्हे, तर कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीप्रमाणे वाटत होते. कुणाच्या घरात दुःख असेल तर ते धावून पोहोचायचे, तर आनंदाच्या क्षणीही ते सहभागी व्हायचे. म्हणूनच त्यांच्या जाण्याने मेळघाटातील प्रत्येक घरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या श्रद्धांजली संदेशातील शब्द आज अधिकच हृदयस्पर्शी वाटत आहेत मेळघाटच्या जनतेसाठी जगले, जनतेध्ये मिसळले आणि जनतेच्या हृदयात स्थान मिळवले.

Buldhana News
Author: Buldhana News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

best news portal development company in india
और देखें