Chikhali City Congress protests against mandatory smart meter
सोलार उद्योगपतींच्या दावणीला बांधले गेल्याचा घणाघात माजी आमदार राहुल बोंद्रे

बुलढाणा न्यूज
चिखली : सोमवार २५ मे रोजी शहर काँग्रेसने स्मार्ट मीटर सक्तीविरोधात चिखलीत जोरदार आंदोलन छेडले. महावितरणच्या उपविभागीय कार्यालयासमोर झालेल्या या आक्रमक आंदोलनात माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी भाजप सरकारवर आणि महावितरणच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. भाजप सरकार हे भांडवलशाही धोरण राबवून महावितरणमध्ये गोरगरीब, शेतकरी, कष्टकर्यांचे नुकसान होईल अशा पद्धतीने व्यूहनिती आखत आहे. महावितरणचा कारभार अत्यंत भ्रष्ट झाला आहे. आधीच विजेचे दर सातत्याने वाढत आहेत. ग्राहकांना बिल का वाढत आहे, हेच समजत नाही. त्यात आता स्मार्ट मीटर लावून लोकांच्या बिलात दुप्पट-तिप्पट वाढ होत आहे. अनेक ठिकाणी जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवले जात आहेत आणि त्यानंतर ग्राहकांना भरमसाट बिले येऊ लागली. सरळ सरळ सोलार कंपन्यांच्या फायद्यासाठी हे धोरण राबवले जात आहे. लोकांनी महावितरणचे मीटर काढून टाकून घरावर सोलार बसवावे, यासाठीच हा सगळा प्रकार सुरू आहे. मात्र पुढे सोलार धारकांनाही फटका बसणार Solar owners will also be affected. आहे. सरकारचे धोरण हे केवळ भांडवलदारांना पोसणारे आहे. एकंदरीत महावितरण हे सोलार उद्योगपतींच्या दावणीला बांधले गेल्याचा घणाघात माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी केला.

स्मार्ट मीटरच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांवर लादला जाणारा आर्थिक भुर्दंड, वाढीव व अवाजवी वीज बिले आणि ग्राहकांच्या संमतीशिवाय सुरू असलेल्या कारभाराविरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणून सोडत महावितरणच्या अधिकार्यांशी चर्चा केली. महावितरण प्रशासनाला निवदेन देवून ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर लावू नयेत, अशी मागणी केली. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
आंदोलनात यांचा सहभाग
न.प. विरोधी पक्षनेते डॉ मोहमद इसरार, संतोष देशमुख, रत्नदीप शिंगरे, प्रशांत भटकर, युवक काँग्रेसचे जकीर शेख,अयान जमादार, भास्कर चांदोरे, व्यंकटेश रिंढे, पवन पाटील, रोहन पाटील, हाजी समद बागबान, कैलास जंगले समीर खान, अबरार शेख,जमील शेख,मोहम्मद शाहरुख, भास्कर चांदोरे, गोपाल देव्हडे, उबेद अली खान ,गोकुळ शिंगणे,आनंद बोंद्रे, डाँ. अमोल लहाने,साजिद हाजीसाहब,जमील ठेकेदार,फाजिल जमादार,शेख अबरार,शेख नासिर, साजिद,हादी भाई,जमादार, शेख अतीक,गुड्डू भाई,संदीप खरात, महेश मुंडलिक, शेख उमैर,शेख अब्दुल,सय्यद भाई,शेख रौशन,विजय जवंजाळ, सौरभ बनपुरे, राहुल तायडे, अमोल पहारे, अमोल सोनुने, गणराज खुर्द, सोमेश घाडगे, विजय बनपुरे, बजरंग खरात, सुरेश शिंगणे, प्रदीप जवंजाळ, शंभू सोनवणे, कैलास जोहरे यांची उपस्थिती होती.
अमेरिकेला बाप म्हणणारे हे सरकार : राहुल बोंद्रे
राज्यात मोठ्या प्रमाणात गॅस, पेट्रोल- डिझेलचा तुटवडा आहे. शेतकरी, गरीब आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांशी या सरकारला काहीही देणेघेणे नाही. भाजप सरकारचे धोरण हे केवळ भांडवलदारांना पोसणारे आहे. श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत आणि गरीब अधिक गरीब होत आहेत. हे सरकार अमेरिकेच्या आणि इस्रायलच्या इशार्यावर चालते. अमेरिकेला बाप म्हणणारे हे सरकार आहे. भारताचा कोणीही बाप होऊ शकत नाही. इथली सर्वसामान्य जनता हीच आमचा देव असल्याचे माजी आमदार राहुल बोंद्रे म्हणाले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची सर्वसामान्यांप्रती असलेली भावना आम्ही महावितरणच्या अधिकार्यांना कळवली आणि यापुढे आणखीन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
जिल्हा परिषद आरोग्य कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आमदार श्वेता महाले यांचा पुढाकार
अठरापगड जातींनी एकत्र येऊन जातनिहाय जनगणनेसाठी मोठा लढा उभारावा : ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके







