इबोला व्हायरसचा प्रादुर्भाव, आफ्रिकेत १३० हून अधिक मृत्यू
नवी दिल्ली : जगातील वाढत्या आरोग्य संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार पूर्णपणे अॅक्शन मोडमध्ये आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आफ्रिकेतील वाढता प्रादुर्भाव पाहून ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी (जागतिक आरोग्य आणीबाणी) घोषित केल्यानंतर, भारत सरकारने तातडीने देशव्यापी हेल्थ अॅडव्हायझरी जारी केली आहे. देशात व्हायरसचा शिरकाव रोखण्यासाठी सर्व विमानतळे , बंदरे आणि आंतरराष्ट्रीय एंट्री पॉईंट्सवर परदेशातून येणार्या प्रवाशांची कडक स्क्रीनिंग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारतात अद्याप इबोलाचा एकही रुग्ण आढळलेला नाही, ही दिलासादायक बाब असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाला नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत.
आफ्रिकेत १३० हून अधिक मृत्यू
इबोला व्हायरसचा प्रादुर्भाव सध्या मध्य आणि पश्चिम आफ्रिकेतील देशांमध्ये वेगाने होत आहे. काँगो, युगांडा, सुदान, गिनी, लायबेरिया आणि सिएरा लिओन या देशांमध्ये या More than 130 deaths in Africa आजाराने आतापर्यंत १३० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे ५०० हून अधिक जण बाधित आहेत. यामुळे भारत सरकारने विशेषतः काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या देशांमधून थेट किंवा इतर मार्गाने भारतात येणार्या प्रवाशांची विमानतळावरच सखोल तपासणी सुरू केली आहे.केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बाधित देशांतून येणार्या प्रवाशांमध्ये संसर्गाची कोणतीही लक्षणे आढळल्यास, त्यांनी इमिग्रेशन तपासणीपूर्वीच विमानतळावरील हेल्प डेस्क किंवा आरोग्य अधिकार्यांना त्वरित माहिती देणे बंधनकारक आहे. याशिवाय, कोणताही प्रवासी नकळत जरी एखाद्या infected with Ebola इबोला बाधिताच्या संपर्कात आला असेल, तर त्यांनी स्वतःहून आरोग्य विभागाला कळवण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.






