गुढीपाडवा ते रामनवमी पर्यंत राबविण्यात येतो उपक्रम
खामगाव/ प्रतिनीधी
आयुर्वेदात गुळवेल, कडुलिंब व अडुळसा मानवाचे हे शरीर निरोगी राखण्यासाठी एक उत्तम औषध आहे. ही बाब हेरून जडीबुटीचे ज्ञान अवगत असलेले वैद्य स्व.किसन दगडू वाघ यांनी ५० वर्षांपूर्वी गुढीपाडवा ते रामनवमी पर्यंत गुळवेल व कडुलिंबाचा काढा मोफत वितरणाचे कार्य सुरू केले होते. त्यांचे हे कार्य आज तिसर्या पिढीतील सुटाळा खुर्द येथील संजय व शिवाजी वाघ आजगयात राबवत आहेत. कोरोना काळातही त्यांनी या कार्यात खंड पडू दिला नाही हे विशेष !
किसन वाघ हे मूळचे जालना जिल्ह्यातील मांजुळनाला येथील रहिवासी होते. त्यांच्या निधनानंतर हे कार्य त्यांचे चिरंजीव भगवान वाघ यांनी हाती घेतले ते एमएसईबी मध्ये नोकरीवर असताना त्यांची बदली जालना येथून चिखली येथे झाली असता त्यांनी त्यांचे वडील स्व.किसन वाघ यांचे कार्याला खंड न पडू देता चिखली येथे काही वर्ष काढा वितरणाचे कार्य सुरू ठेवले नंतरच्या काळात ते खामगाव येथे बदलून आले त्यानंतर हे कार्य त्यांचे चिरंजीव संजय व शिवाजी वाघ यांनी सन १९८६ पासून त्यांच्या मार्गदर्शनात सुटाळा खुर्द येथे आपल्या हाती घेतले ते कार्य आजगयात निरंतर सुरू आहे. गुळवेलचे वेल खामगाव शहरात मोठ्या प्रमाणात मिळत नसल्याने वाघ बंधूंनी यंदा पारखेड,पहुरजिरा व सुटाळा या गावाच्या आजूबाजूला असलेल्या जंगलातून शोध घेऊन गुळवेलच्या काड्या आणल्या आहेत.
यंदा मोफत काढा वितरणाला १९ मार्च २०२६ पासून आरंभ केला आहे. त्याचे वितरण २६ मार्चपर्यंत म्हणजे गुढीपाडवा ते रामनवमी या कालावधीत करण्यात येणार आहे. दररोज १५० लिटर गुळवेलचा व १५० लिटर कडुलिंबाचा काढा तयार करून त्याचे वितरण पहाटे ५ वाजता पासून ते काढा संपेपर्यंत सुटाळा खुर्द फाट्याजवळ करण्यात येत आहे. हा काढा तयार करण्याचे कार्य सकाळी तीन वाजतापासून सुरू करण्यात येते. हा काळा तयार करण्यात येत आहे याला तब्बल दोन तासाचा कालावधी लागतो वाघ परिवारातील भगवान किसन वाघ, जयवंता भगवान वाघ, भरत भगवान वाघ, उषा भरत वाघ,विशाल भरत वाघ, सपना भरत वाघ, संजय भगवान वाघ, संगीता संजय वाघ,रितेश संजय वाघ, मनाली संजय वाघ, शिवाजी भगवान वाघ,नीता शिवाजी वाघ, सृष्टी शिवाजी वाघ, तनुश्री शिवाजी वाघव रुख्मीणी भागवत इंगळे हे करीत आहे. त्यांना गुळवेलच्या काड्या कुटण्यासाठी संजीवनी राऊत, निशा खंडारे, शारदा राऊत, रुख्मीणी इंगळे, आशा लहासे, श्रीमती काळे, श्रीमती गोरे यांचे सहकार्य लाभत आहे.
भेदभाव न करता वितरणाचे कार्य
सुटाळा खुर्द फाट्यावर लावण्यात आलेल्या स्टॉलवर कोणत्याच प्रकारचा भेदभाव न करता याचे वितरण करण्यात येत आहे. हे वितरण रितेश वाघ, भगवान वाघ,संजय वाघ,संगीता वाघ, शिवाजी वाघ, नीता वाघ, सृष्टी वाघ,तनुश्री वाघ, मनाली वाघ, विशाल वाघ व पद्माकर भोज करीत आहे.
पुढील पिढीही निरंतर कार्य सुरू ठेवेल
गुळवेलच्या काढ्याच्या माध्यमातून जनतेचे आरोग्य निरोगी राहण्यास आपला काही प्रमाणात का होईना हातभार लागत आहे.याचे मला व माझ्या परिवारातील लोकांना समाधान वाटते अनेक जण आपल्याला प्रत्यक्ष भेटून या कार्याचे तोंड भरून कौतुक करत आहे. मी जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत काढा वितरणाचे कार्य सुरूच ठेवणार आहे. माझे पश्चात हे कार्य मुले निरंतर ठेवतील अशी मला अपेक्षाच नाही तर संपूर्ण विश्वास आहे.
- संजय भगवान वाघ
सुटाळा खुर्द







