दुर्रानी खान यांना दहा हजार रुपयांची रोख मदत
चिखली : तालुक्यातील अमडापूर येथील एका टेलरींग काम करणार्या दुकानाला बुधवार, २५ फेब्रुवारी रोजी भीषण आग लागली होती. या आगीच्या भक्ष्यस्थानी दुकानातील तयार कपडे, कापडाचासाठा यासह इतर साहित्य जळून खाक झाले आहे. यामध्ये दुकानाचे मालक तथा दुर्रानी खान जिलानी खान यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या घटनेची माहिती बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी गुरुवार, २६ फेब्रुवारी रोजी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली व दुर्रानी खान यांना धीर दिला. यावेळी अनुराधा अर्बन बँकेच्या वतीने दुर्रानी खान यांना दहा हजार रुपयांची रोख मदत सुपूर्द करण्यात आली.
बोंद्रे यांनी अधिकार्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधून नुकसानग्रस्तांना शासनाकडून नुकसानभरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा केला. अनुराधा परिवाराने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. संकटाच्या प्रसंगी धावून जाणे हीच खरी सामाजिक जबाबदारी असल्याच्या भावना राहुल बोंद्रे यांनी व्यक्त केल्या.यावेळी अमडापूर काँग्रेस शहराध्यक्ष रफिक मेंबर, माजी जिल्हा परिषद सदस्य शाम पठाडे, सरपंच तथा संचालक बाजार समिती संजय गवई, उपसरपंच अजीस खान, अर्जुन नेमाडे, हैदर कुरेशी, माजी सरपंच दिलीप खंदलकर, दर्शन देशमुख, रवि पाखरे, भारत खासबगे, शेख साबीर, राजाज कुरेशी, मुशीर खान यांच्यासह अमडापूर ग्रामस्थ उपस्थित होते.






