best news portal development company in india

बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ.पाटील यांच्याहस्ते शास्त्रीय गायक चंद्रशेखर कोल्हेंचा सन्मान

SHARE:

बुलढाणा / प्रतिनिधी
चिखली तालुक्यातील धोडप येथील रहिवाशी चंद्रशेखर कैलास कोल्हे यांनी हिंदूस्थानी शास्त्रीय संगीतामध्ये भारतातुन तृतीय क्रमांक प्राप्त केल्यामुळे जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांचे हस्ते प्रजासत्ताक दिनी शासनाच्या वतीने त्यास सन्मानित करण्यात आले. बुलढाणा विधानसभा आमदार संजय गायकवाड, जिल्हा पोलिस अधिक्षकनिलेश तांबे, कैलास कोल्हे सर (संगीत शिक्षक,सहकार विद्या मंदिर,बुलढाणा), सौ.अनिता कैलास कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थित त्यांना सन्मानित करण्यात आले.

भारतातील सर्वात मोठी आँनलाईन आणि ऑफलाईन हिन्दूस्थानी शास्रीय ख्याल गायन स्पर्धेत सहभाग घेत
चंद्रशेखर कोल्हे हा भारतातून तृतीय विजेता आहे. हिंदुस्तानी शास्त्रीय ख्याल गायन स्पर्धा पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत चंद्रशेखर याने राग मारवाचा छोटा ख्याल व राग पुरिया चा बडा ख्याल सादर करून त्या दोन्ही रागामध्ये साम्य काय व भेद काय आहे ? या दोनही विषयाचे समर्पक सादरीकरण केले.

चंद्रशेखर कोल्हे याने त्याच्या उत्कृष्ट गायकीने कार्यक्रम स्थळे असलेल्या उपस्थितांची मने जिंकली.या सर्व परिक्षणातून त्याला तृतीय पारितोषिक विजेता घोषित करण्यात आले. चंद्रशेखर कोल्हे हा डि.वाय.पाटील कॉलेज, पुणे येथे इंजिनिअरींग च्या तृतीय वर्षाला शिकत असुन तो गायनामध्ये संगीत अलंकार प्रथम श्रेणीत असून तबला विशारद आहे.

चंद्रशेखर कोल्हे याने गायन आणि तबला वादनाचे शिक्षण त्याचे वडील व गुरु कैलास कोल्हे यांच्याकडून घेतले आहे. आई-वडिलांच्या तालमीत तयार झालेला चंद्रशेखर हा इंजीनियरिंगचे शिक्षण घेत तो, संगीत साधना करीत आहे.

Sadhna Thorat
Author: Sadhna Thorat

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *