best news portal development company in india

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवारी

SHARE:

महिला लोकशाही दिनाचा लाभ घ्यावा – अमोल डिघुळे

बुलढाणा / जिमाका
दर महिन्याच्या तिसर्‍या सोमवारी शासन निर्णयानुसार जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येतो. त्याअनुषंगाने फेब्रुवारी महिन्याचा महिला लोकशाही दिन सोमवार, दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात येणार आहे. तरी पिडीत महिलांनी महिला लोकशाही दिनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महिला व बालविकास अधिकारी अमोल डिघुळे यांनी केले आहे.

महिला लोकशाही दिनात समस्याग्रस्त व पीडित महिलांनी उपजिल्हाधिकारी यांना उद्देशून विहित नमुन्यातील अर्ज द्विप्रतीत सादर करावेत. तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असणे आवश्यक आहे. लोकशाही दिनामध्ये महिलांनी स्वतः उपस्थित राहणे अनिवार्य आहे. विहित नमुन्यात नसलेले अर्ज, न्यायप्रविष्ट, सेवा व आस्थापना विषयक प्रकरणे तसेच वैयक्तिक स्वरूपाचे नसलेले निवेदन स्वीकारले जाणार नाही. समस्याग्रस्त व पीडित महिलांचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने शासनाने हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून, पीडित महिलांनी महिला लोकशाही दिनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Sadhna Thorat
Author: Sadhna Thorat

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *