बुलढाणा न्यूज.इन
बुलडाणा- घटक चाचणीत गुण वाढविण्याच्या बहाण्याने विद्यार्थिनीवर अत्त्याचार; शिक्षकावर पोस्कोतंर्गत गुन्हा,पाच दिवसांची पोलीस कोठडी बुलडाणा येथून एक अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना आहे. घटक चाचणी मार्क्स वाढवून देतो असे म्हणत विद्यार्थिनीवर शिक्षकानेच अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. एवढेच नाही तर शिक्षकाला कठोर शिक्षेची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सविस्तर वृत्त असे की आरोपीचं शिक्षकाचं नाव मुकेश परमसिंग रबडे (वय वर्ष ४० रा. तरोडा तालुका मोताळा) असे आहे. शिक्षकाने तरुणीला मोबाईलवर कॉल करून माझ्याकडे पॉलिचे पुस्तक आहे. नोट्स आहे ते मी तुला देतो व तुझे प्रॅक्टिकल्सचे मार्क्स वाढून देण्यास सांगतो असे सांगून मलकापूर येथील तहसील चौक येथे बोलावले.
त्यानंतर असे घडले..
गाडीवर बसवून बुलडाणा रोडवरील पंचमुखी मंदिर जवळील एका खोलीत नेले. त्याठिकाणी पीडित मुलीवर अत्याचार केले एवढेच नाही तर याचे रेकॉर्डिंगही केले. त्यानंतर तिला तहसील चौक येथे आणून सोडून दिले. याघटनेबाबत कोणालाही सांगू नको नाही तर स्क्रीन रेकॉर्डिंग व्हायरल करेल अशी धमकी सुद्धा त्याने पीडित मुलीला दिली. तिला मारहाण देखील करण्यात आले. यानंतर आरोपी रबडे याने अनेक वेळा त्या तरुणीला फोन केले. मात्र पीडित तरुणीने फोन न उचलल्यामुळे तो धमकी देऊ लागला. याच त्रासाला कंटाळून तरुणीने तिचे वडील भाऊ यांना हा सर्व प्रकार सांगितला. कुटुंबीयांनी तात्काळ पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि तक्रार नोंदवली. तक्रारीवरून दोन आरोपींविरुद्ध पोस्को अंतर्गत मलकापूर शहर पोलीस स्टेशनला विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामधील एका आरोपीस अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.






